परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये क्विंटल

भेंडी
भेंडी
परभणी  ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ११)  भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. भेंडीला १२०० ते २००० रुपये क्विंटल असे दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
मार्केटमध्ये शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. शेवग्याला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. गवारीची ५ क्विंटल आवक झाली. गवारीला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. चवळीला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
पालेभाज्यांमध्ये पालकाची ३५ क्विंटल आवक झाली. पालकाला ५०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक झाली. चुक्याला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक झाली. शेपूला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. 
कारल्याची १० क्विंटल आवक झाली. कारल्याला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
काकडीची ४० क्विंटल आवक झाली. काकडीला ७०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक झाली. कोबीला ४०० ते ६०० रुपये क्विंटल दर मिळाले. वांग्याची ३५ क्विंटल आवक असताना १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक झाली.
 
टोमॅटोला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक झाली. ढोबळ्या मिरचीस २००० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. कैरीची ८० क्विंटल आवक झाली. कैरीला १००० ते १८०० रुपये क्विंटल दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com