पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प वाढ

काळा पावट्याची आवक
काळा पावट्याची आवक
पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली. आवक स्थिर हाेती तर गवार, भेंडी, चवळी यांच्या दरात अल्प वाढ झाली. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर हाेते. 
आवकेमध्ये परराज्यांतील बंगळूर येथून दोन टेंपो आलेची, मध्य प्रदेशमधून सुमारे १३ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १६ टेंपो हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ६ टेंपो शेवगाची, राजस्थान येथून १२ ट्रक गाजराची, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची तीन ते साडेतीन हजार गोणी आवक झाली हाेती. 
स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ८०० गाेणी, टॉमेटाेची सुमारे सहा हजार क्रेट, हिरव्या मिरचीची ५ टेंपो, फ्लॉवरची १५ टेंपो, काकडीची १० टेंपो, कोबीची २२ टेंपो, ढोबळी मिरचीची १२ टेंपो, पावटा आणि वांगीची प्रत्येकी सुमारे ८ टेंपो, तांबडा भोपळ्याची १२ टेंपो, गवारीची ५ टेंपो, कांद्याची सुमारे २२५ ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली हाेती.
फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः कांदा : २००-२५०, बटाटा : ५०-९०, लसूण : १५०-३०० आले : सातारी : २००-२६०, बंगळूर: २६०-२८०, भेंडी : ३००-४००,  गवार : गावरान व सुरती ५००-६००, टोमॅटो : ३००-६००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १८०-२२०, काकडी : ७०-८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२२०, पापडी : १८०-२००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ३०-६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ४५०-५००, गाजर : १४०-१६०, वालवर : १८०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : ३५०, पावटा : २००-३००, मटार : परराज्य : २४०-२६०, स्थानिक : २६०-२८०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख, मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे दर (शेकडा)ः कोथिंबीर : २००-६००, मेथी : २००-६००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-८०० राजगिरा : ५००-६००, चुका : ७००-८००, चवळई : ७००-८००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-८००.
फळ बाजारातात लिंबाची सुमारे ४ हजार गोणी, संत्र्याची सुमारे ६ टन, मोसंबीची ६० टन, डाळिंबाची ४० टन, कलिंगडाची १० टेंपो, पपईची सुमारे २५ टेंपो, खरबुजाची ५ टेंपो, चिकूचे १ हजार बॉक्स, पेरूचे ३ हजार क्रेट्स, किन्नूची तीन ते चार हजार बॉक्‍स, द्राक्षाची सुमारे १६ टन, स्ट्रॉबेरीची ६  टन, बोरांची सातशे ते साडेसातशे गोणी आवक झाली हाेती. 
फळांचे दर ः लिंबे (प्रति गोणी) : ४०-१३०, मोसंबी : (३ डझन) : १००-४००, (४ डझन ) : ४०-२२०, संत्रा : ( ३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ६०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ०५-१३, खरबूज : १०-२५, पपई  : ०५-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो क्रेट) : २००-५००, सफरचंद : सिमला (२५ किलो) : १५००-२०००, काश्मीर डेलिशियस (१५ किलो) ६००-१२००, किन्नोर : ( २५ किलो) २०००-२५००, अमेरिकन : (१५ किलो) १०००-१३००, महाराजा ( १५ किलो) : ५००-७००, किन्नू (१० किलो) : ४००-४५०. बोरे : चेकनट (१० किलो) ३००-३५०, चण्यामण्या : ४००-४५०, चमेली : ८०-१२०, उमराण : ३०-४०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ६००-८००, सुपर सोनाका (१५ किलो) : ७००-१२००, जम्बो (१० किलो) : ५००-९००, शरद (१५ किलो) : ७००-१०००, सोनाका (१५ किलो) : ६००-९००, सरिता (१० किलो) ७००-१०००, थॉमसन (१५ किलो): ५००-७००, स्ट्रॉबेरी (२ किलाे पनेट) ८०-१३०.
गेल्या रविवारी (ता.१४) संक्रात आणि रविवारी (ता.२१) गणेश जयंती अशा सलग दाेन रविवारी सण आल्यामुळे मटण, मासळी, चिकन यांच्या मागणीत घट झाली हाेती. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी ( ता. २१ ) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची सुमारे १५० किलो तर नदीची सुमारे २५० आणि आंध्र प्रदेशातून धरणातील रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे ५ टन आवक झाली हाेती. यामुळे आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर हाेते. 
भाव (प्रतिकिलो) ः पापलेट कापरी ः १४००, मोठे ः १४००, मध्यम ः ९००, लहान ः ६५०, भिला ः ५५०, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ६००, घोळ ः ५५०, करली ः २००-२४०, करंदी ( सोललेली ) ः २८०, भिंग ः २००, पाला : ४००-१२००, ओले बोंबील ः १००-१४०, वाम ( पिवळी) : २८०-७००, काळी : २८०.
कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४४०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २००-२८०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : १८०-२००, चिंबोऱ्या : ४८०.
खाडीची मासळी ः सौंदाळे ः २००, खापी ः २४०, नगली ः २४०-४००, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १४०-२००, शेवटे : २००, बांगडा : १००-१६०, पेडवी ः ५०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १००, तारली : १४०. 
नदीची मासळी ः रहू ः १८०, कतला ः १८०, मरळ ः ४८०, शिवडा : २००, चिलापी : ४०, मांगूर : १४०, खवली : १६०,आम्ळी ः ६०, खेकडे ः १२०, वाम ः ४००.
मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०. चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी ः गावरान शेकडा : ७५०, डझन : १०२, प्रति नग : ८.५०, इंग्लिश शेकडा : ४४५, डझन : ६०, प्रतिनग : ५.
फुलांचे दर (प्रति किलो) ः झेंडू : १०-४०, गुलछडी : ८०-१६०, बिजली : २०-५०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-८०, अॅस्टर : १०-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १५-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ६-१०, अबोली लड : २५०-३००, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१४०, कागडा २००-२५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com