agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जानेवारी 2018
पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली. आवक स्थिर हाेती तर गवार, भेंडी, चवळी यांच्या दरात अल्प वाढ झाली. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर हाेते. 
 
पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली. आवक स्थिर हाेती तर गवार, भेंडी, चवळी यांच्या दरात अल्प वाढ झाली. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर हाेते. 
 
आवकेमध्ये परराज्यांतील बंगळूर येथून दोन टेंपो आलेची, मध्य प्रदेशमधून सुमारे १३ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १६ टेंपो हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ६ टेंपो शेवगाची, राजस्थान येथून १२ ट्रक गाजराची, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची तीन ते साडेतीन हजार गोणी आवक झाली हाेती. 
 
स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ८०० गाेणी, टॉमेटाेची सुमारे सहा हजार क्रेट, हिरव्या मिरचीची ५ टेंपो, फ्लॉवरची १५ टेंपो, काकडीची १० टेंपो, कोबीची २२ टेंपो, ढोबळी मिरचीची १२ टेंपो, पावटा आणि वांगीची प्रत्येकी सुमारे ८ टेंपो, तांबडा भोपळ्याची १२ टेंपो, गवारीची ५ टेंपो, कांद्याची सुमारे २२५ ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली हाेती.
 
फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः कांदा : २००-२५०, बटाटा : ५०-९०, लसूण : १५०-३०० आले : सातारी : २००-२६०, बंगळूर: २६०-२८०, भेंडी : ३००-४००,  गवार : गावरान व सुरती ५००-६००, टोमॅटो : ३००-६००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १८०-२२०, काकडी : ७०-८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२२०, पापडी : १८०-२००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ३०-६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ४५०-५००, गाजर : १४०-१६०, वालवर : १८०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : ३५०, पावटा : २००-३००, मटार : परराज्य : २४०-२६०, स्थानिक : २६०-२८०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख, मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे दर (शेकडा)ः कोथिंबीर : २००-६००, मेथी : २००-६००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-८०० राजगिरा : ५००-६००, चुका : ७००-८००, चवळई : ७००-८००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-८००.
 
फळ बाजारातात लिंबाची सुमारे ४ हजार गोणी, संत्र्याची सुमारे ६ टन, मोसंबीची ६० टन, डाळिंबाची ४० टन, कलिंगडाची १० टेंपो, पपईची सुमारे २५ टेंपो, खरबुजाची ५ टेंपो, चिकूचे १ हजार बॉक्स, पेरूचे ३ हजार क्रेट्स, किन्नूची तीन ते चार हजार बॉक्‍स, द्राक्षाची सुमारे १६ टन, स्ट्रॉबेरीची ६  टन, बोरांची सातशे ते साडेसातशे गोणी आवक झाली हाेती. 
 
फळांचे दर ः लिंबे (प्रति गोणी) : ४०-१३०, मोसंबी : (३ डझन) : १००-४००, (४ डझन ) : ४०-२२०, संत्रा : ( ३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ६०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ०५-१३, खरबूज : १०-२५, पपई  : ०५-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो क्रेट) : २००-५००, सफरचंद : सिमला (२५ किलो) : १५००-२०००, काश्मीर डेलिशियस (१५ किलो) ६००-१२००, किन्नोर : ( २५ किलो) २०००-२५००, अमेरिकन : (१५ किलो) १०००-१३००, महाराजा ( १५ किलो) : ५००-७००, किन्नू (१० किलो) : ४००-४५०. बोरे : चेकनट (१० किलो) ३००-३५०, चण्यामण्या : ४००-४५०, चमेली : ८०-१२०, उमराण : ३०-४०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ६००-८००, सुपर सोनाका (१५ किलो) : ७००-१२००, जम्बो (१० किलो) : ५००-९००, शरद (१५ किलो) : ७००-१०००, सोनाका (१५ किलो) : ६००-९००, सरिता (१० किलो) ७००-१०००, थॉमसन (१५ किलो): ५००-७००, स्ट्रॉबेरी (२ किलाे पनेट) ८०-१३०.
 
गेल्या रविवारी (ता.१४) संक्रात आणि रविवारी (ता.२१) गणेश जयंती अशा सलग दाेन रविवारी सण आल्यामुळे मटण, मासळी, चिकन यांच्या मागणीत घट झाली हाेती. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी ( ता. २१ ) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची सुमारे १५० किलो तर नदीची सुमारे २५० आणि आंध्र प्रदेशातून धरणातील रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे ५ टन आवक झाली हाेती. यामुळे आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर हाेते. 
 
भाव (प्रतिकिलो) ः पापलेट कापरी ः १४००, मोठे ः १४००, मध्यम ः ९००, लहान ः ६५०, भिला ः ५५०, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ६००, घोळ ः ५५०, करली ः २००-२४०, करंदी ( सोललेली ) ः २८०, भिंग ः २००, पाला : ४००-१२००, ओले बोंबील ः १००-१४०, वाम ( पिवळी) : २८०-७००, काळी : २८०.
 
कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४४०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २००-२८०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : १८०-२००, चिंबोऱ्या : ४८०.
खाडीची मासळी ः सौंदाळे ः २००, खापी ः २४०, नगली ः २४०-४००, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १४०-२००, शेवटे : २००, बांगडा : १००-१६०, पेडवी ः ५०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १००, तारली : १४०. 
 
नदीची मासळी ः रहू ः १८०, कतला ः १८०, मरळ ः ४८०, शिवडा : २००, चिलापी : ४०, मांगूर : १४०, खवली : १६०,आम्ळी ः ६०, खेकडे ः १२०, वाम ः ४००.
मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०. चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी ः गावरान शेकडा : ७५०, डझन : १०२, प्रति नग : ८.५०, इंग्लिश शेकडा : ४४५, डझन : ६०, प्रतिनग : ५.
 
फुलांचे दर (प्रति किलो) ः झेंडू : १०-४०, गुलछडी : ८०-१६०, बिजली : २०-५०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-८०, अॅस्टर : १०-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १५-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ६-१०, अबोली लड : २५०-३००, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१४०, कागडा २००-२५०.

इतर बाजारभाव बातम्या
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...
गुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...
पुण्यात कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटोचे...पुणे : ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता असल्याने...
दक्षिणेत बाजार सावरला; महाराष्ट्रातही...विविध कारणांमुळे मंदीत असलेला ब्रॉयलर्सच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल १०० ते १०००...पुणे : सध्या राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात केळीचे दर टिकूनजळगाव : जिल्ह्यात केळीचे दर जवळपास महिनाभरापासून...
जळगावात हिरवी मिरची, सोयाबीनचे दर वाढलेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, कोथिंबीर, शेपूच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांद्यात अजून दरवाढीचे संकेतनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील बाजार...
नागपूरला सोयाबीन ३६६० रुपयांवरनागपूर : शेतकऱ्यांकडील ९० टक्‍के सोयाबीन विकल्या...
कोल्हापुरात हिरवी मिरची वधारलीकोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात मोसंबी, डाळिंबाचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपुरात सोयाबीनच्या दरात आली तेजीनागपूर  ः स्थानिक कळमणा बाजार समितीत गेल्या...
नाशिकला कांदा १८०० ते २५०० रुपयांवरनाशिक : नाशिक जिल्ह्यात गत सप्ताहात प्रतिदिनी...
रविवारचा बाजार : पुण्यात भाजीपाल्याची... पुणे ः प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी (ता....
खप घटल्यामुळे नरमला ब्रॉयलर्सचा बाजार विविध कारणांमुळे बाजारात पुरवठा वाढला असून,...
साताऱ्यात वांगी, मेथी, कोथिंबीर तेजीतसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...