agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

रविवारचा बाजार : पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
पुणे ः प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २६) आणि शनिवारी (ता. २७) साप्ताहिक बंदमुळे गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला व पालेभाज्यांच्या आवेकत वाढ झाली. 
 
पुणे ः प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २६) आणि शनिवारी (ता. २७) साप्ताहिक बंदमुळे गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला व पालेभाज्यांच्या आवेकत वाढ झाली. 
 
आवकेमध्ये परराज्यांतून बंगळूर येथून दोन टेंपो आल्याची, मध्य प्रदेशमधून सुमारे १३ ते १५ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १६ ते १८ टेंपो हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ६ टेंपो शेवग्याची, राजस्थान येथून १० ते १२ ट्रक गाजराची, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून तीन ते साडेतीन हजार गोणी लसणाची आवक झाली.
 
स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ८०० गाेणी, टोमॅटाेची सुमारे सात हजार क्रेट, हिरव्या मिरचीची ५ टेंपो, फ्लॉवरची १४ ते १५ टेंपो, काकडीची १० टेंपो, कोबीची २० ते २२ टेंपो, ढोबळी मिरचीची १२ टेंपो, पावटा आणि वांग्याची प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेंपो, तांबडा भोपळ्याची १२ टेंपो, गवारीची ५ टेंपो, कांद्याची सुमारे १७५ ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.
 
फळभाज्यांचे दर (प्रति दहाकिलो) ः
कांदा : २२०-२८०, बटाटा : ८०-११०, लसूण : १५०-२५०, आले : सातारी : १८०-२३०, बेंगलोर: २५०-२७०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान ४५०-५००, सुरती ४००-५००, टोमॅटो : ५०-७०, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : १६०-२००, दुधी भोपळा : १२०-१६०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी ३२०-३५०, पांढरी : ३००-३२०, पापडी : १४०-१८०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : ४०-६०, वांगी : २००-३००, डिंगरी : १२०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १८०-२००, तोंडली : कळी १८०-२००, जाड : १५०-१८०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : १००-१६०, बीट : ४०-५०, घेवडा : १८०-२२०, कोहळा : ८०-१२०, आर्वी : ४००-४२०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग : ३८०-४२०, पावटा : २००-२५०, मटार : परराज्य : २४०-२८०, स्थानिक : ३००-३२०, तांबडा भोपळा : ८०-१००, सुरण : २५०-२६०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची सुमारे पावणेदाेन लाख जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा) ः कोथिंबीर : ४००-८००, मेथी : ३००-५००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-८००, करडई : ४००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१००० राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-५००, पालक : ४००-४००, हरभरा गड्डी : ५००-८००.
 
रविवारी (ता.२८) फळबाजारात मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची १५ टन, डाळिंबाची सुमारे २५ टन, पपईची २० टेंपोे, लिंबाची सुमारे ५ हजार गोणी, चिकूची एक हजार डाग, पेरूची सुमारे २०० क्रेट, कलिंगडाची २५ टेंपो, खरबुजाची १५ टेंपो आवक झाली. बोरांचा हंगाम संपत आला असून, विविध बाेरांची सुमारे साडेतीनशे गोणी आवक झाली हाेती. विविध द्राक्षांची सुमारे १६ टन, स्ट्रॉबेरीची सहा टन आवक झाली हाेती.  
 
फळांचे दर ः लिंबे (प्रति गोणी) : ५०-१३०, मोसंबी : (३ डझन) : ११०-४५०, (४ डझन) : ६०-२४०, संत्रा : (३ डझन) १००-३००, (४ डझन) : ५०-१४०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश १०-३०, आरक्ता २०-५० कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई  : ३-२०, चिकू : १००-५०० पेरू (२० किलो) : ५००-८००, सफरचंद : सिमला (२५ किलो) : १५००-२०००, काश्मीर डेलिशियस (१५ किलो) ७००-१३००, किन्नोर : ( २५ किलो) २०००-२५००, अमेरिकन : (१५ किलो) १२००-१३००,  किन्नू (१० किलो) : ३००-३५०. बोरे : चेकनट (१० किलो) ५००-५५०, चन्यामन्या : ४५०-५००, चमेली : १००-१५०, उमराण : ३५-५०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ५००-७००, सुपर सोनाका (१५ किलो) : ६००-११००, जंबो (१० किलो) : ४००-८००, शरद (१५ किलो) : ६००-९०० सोनाका (१५ किलो) : ५००-८००, सरिता (१० किलो) ६००-९०० थॉमसन (१५ किलो): ४००-६००, स्ट्रॉबेरी ८०-१३०. 
 
थंडीच्या कडाक्यामुळे गुलछडीच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक निम्माने घटली हाेती. परिणामी, दरात वाढ झाली हाेती. इतर फुलांची आवक सुरळीत असून, दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
 
फुलांचे दर (प्रतिकिलो) ः झेंडू : १०-४०, गुलछडी : १००-१५०, बिजली : २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-४० अॅस्टर : १०-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : २०-३०, गुलछडी काडी : १५-५०, डच गुलाब (२० नग) : ७०-११०, लिली बंडल : ४-६, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : ८०-१२०, कागडा १५०-२५०.
 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १४ टन, खाडीची सुमारे ३०० किलो आणि नदीची सुमारे ५०० किलो आवक झाली. आंध्रप्रदेशातील रहू, कतला, सिलन या मासळींची सुमारे १४ टन आवक झाली हाेती. 
मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १६००, मोठे : १५००, मध्यम : १०००, लहान : ७५०, भिला : ६००, हलवा : ५२०, सुरमई : ५२०, रावस लहान : ४८०, मोठा : ६५०, घोळ : ६००, करली : २४०, करंदी ( सोललेली ) : २८०, भिंग : ३२०, पाला : ६००-१२००, वाम : ३४०-८००, ओले बोंबील : १६०. 
 
कोळंबी : लहान : ३६०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १५००, मोरी : २००-८००, मांदेली : १००, राणीमासा : १८०, खेकडे : २०० चिंबोर्‍या : ४८०. 
 
खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ३२०, तांबोशी : ३६०, पालू : २००, लेपा : १६०, शेवटे : २००, बांगडा : १६०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४० तिसऱ्या : १६०, खुबे : १६०, तारली : १४०. नदीची मासळी : रहू : १६०, कतला : २००, मरळ : ४००, शिवडा : १४०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : २००,  आम्ळी : ८०, खेकडे : १६०, वाम : ५००. 
 
मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे : ४४०, खिमा : ४४०, कलेजी : ४८०. 
चिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 
अंडी : गावरान : शेकडा : ७३०, डझन : १०२ प्रति नग : ८.५०. इंग्लिश : शेकडा : ४०० डझन : ६०, प्रतिनग : ५.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...