agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018
पुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन घटले आहे. भाजीपाल्याच्या घटलेल्या आवकेमुळे रविवारी (ता. १८) गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीत लसूण, आले, फ्लाॅवर, काेबी, मटार, पावटा या शेतीमालाच्या दरात वाढ झाली हाेती. बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे १३० ट्रक आवक झाली हाेती. गुढीपाडव्यानिमित्त काेकणातून हापूस आंब्याच्या सुमारे दीड हजार पेट्यांची आवक झाली हाेती. पालेभाज्यांची आवक तुलनेने घटल्याने दरात वाढ झाली हाेती.
 
पुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन घटले आहे. भाजीपाल्याच्या घटलेल्या आवकेमुळे रविवारी (ता. १८) गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीत लसूण, आले, फ्लाॅवर, काेबी, मटार, पावटा या शेतीमालाच्या दरात वाढ झाली हाेती. बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे १३० ट्रक आवक झाली हाेती. गुढीपाडव्यानिमित्त काेकणातून हापूस आंब्याच्या सुमारे दीड हजार पेट्यांची आवक झाली हाेती. पालेभाज्यांची आवक तुलनेने घटल्याने दरात वाढ झाली हाेती.
 
आवकेमध्ये परराज्यांतील पंजाब, सिमला येथून मटारची सुमारे ४ ट्रक, राजस्थान येथून गाजराची सुमारे ८ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबीची सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून हिरवी मिरचीची सुमारे ४ टेम्पाे, बेंगळूर येथून आल्याची सुमारे ३ टेंपाे आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ५ टेंपाे आवक झाली. कर्नाटकातून ताेतापुरी कैरीची सुमारे ४ टेंपाे, तर मध्य प्रदेश, गुजरात येथून लसणाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती.
 
स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ८०० गाेणी, टाेमॅटाेची सुमारे ५ हजार क्रेट, हिरवी मिरचीची ४ टेंपो, सिमला मिरचीची १२ टेंपाे, काेबी व फ्लॉवरची प्रत्येकी ८ ते १० टेंपो, काकडीची १० ते १२ टेंपो, मटारची ४० गाेणी, पावटाची ५ टेंपाे, तांबड्या भाेपळ्याची १२ टेम्पाे, भेंडीची ८, गवारीची २ टेंपाे, स्थानिक गाजराची सुमारे ४०० गाेणी आवक झाली. कांद्याची सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली हाेती.
 
फळभाज्यांचे दर (प्रतिदहाकिलो) ः कांदा : ७५-८५, बटाटा : ८०-१४०, लसूण : १५०-३०० आले : सातारी: ३००-३२०, बेंगलोर : ३६०-३८०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १८०-२००, पांढरी : १५०-१६०, पापडी : १४०-१६०, पडवळ : १६०-२००, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : २०-४०, वांगी : ५०-१००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१२०, ढोबळी मिरची : १५०-२००.
 
तोंडली : कळी २००-२५०, जाड : ८०-१००, शेवगा : १४०-१६०, गाजर : स्थानिक ६०-८०, परराज्य ८०-१२०, वालवर : १५०-२००, बीट : ४०-८०, घेवडा : १५०-२००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसाळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ३००-४००, मटार : स्थानिक ३००-३५०,परराज्य : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच अखंड ३००-३२०, फाेडलेली ६००-६५०, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती.  पालेभाज्यांचे दर (शेकडा) ः कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ५००-७००, शेपू : ४००-६००, कांदापात : ४००-६००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-१५०, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-७०० राजगिरा : ३००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-६००, पालक : ३००-५००, हरभरा गड्डी : ३००-६००.
 
रविवारी (ता. १८) फळबाजारात संत्री आणि मोसंबीची प्रत्येकी सुमारे ४० टन, डाळिंबाची सुमारे ३५ टन, पपईची १२ टेंपोे, लिंबाची सुमारे ४ हजार गोणी, चिकूची २ हजार बॉक्स, पेरूची सुमारे २०० क्रेट, कलिंगडाची ३५ टेंपाे, खरबुजाची २० टेंपाे, विविध द्राक्षांची सुमारे २५ टन आवक झाली हाेती. तर गुढीपाडव्यानिमित्त काेकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे दीड हजार पेट्यांची आवक झाली हाेती. उन्हाळ्यामुळे लिंबाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने दरातदेखील वाढ झाली अाहे.
 
फळांचे दर ः लिंबू (प्रतिगोणी) : २५०-९००, मोसंबी : (३ डझन) : २००-३५०, (४ डझन ) : १३०-२००, संत्रा : (३ डझन) १५०-४००, (४ डझन) : ६०-१८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१४०, गणेश १०-३०, आरक्ता २०-६०, कलिंगड : ५-१० (प्रतिकिलो), खरबुज : १०-२० (प्रतिकिलो), पपई : ५-१५, चिकू : (प्रति १० किलाे) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-७००, द्राक्षे : ताश ए गणेश (१५ किलो) ५००-७००, सुपर सोनाका (१५ किलो) : ७००-११००, जम्बो (१० किलो) : १०००-११००, सोनाका (१५ किलो) : ७००-९००. थाॅमसन (१५ किलाे) ४५०-५५०, शरद (१५) ८००-१०००, आंबा हापूस ४ ते ८ डझन -२ हजार ५०० ते ५ हजार रुपये. 
 
रविवारी (ता. १८) गुढीपाडवा आणि सोमवारी (ता. १९) उपवासामुळे मासळीची आवक तसेच मागणी कमी हाेती. आवक कमी झाली तरी नियमित ग्राहक कायम असल्याने मासळीचे दर टिकून हाेते. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ ते ७ टन, खाडीची सुमारे १०० ते १५० किलो आणि नदीतील मासळीची ५०० ते ६०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेशातील रहू, कटला, सीलन या मासळींची सुमारे ८ टन आवक झाली हाेती.
 
मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १४००, मोठे : १४००, मध्यम : १०००-१२००, लहान : ८००-८५०, भिला : ६००, हलवा : ५५०, सुरमई : ६००-६५०, रावस लहान : ६००, मोठा : ८००, घोळ : ६००, करली : २४०-३६०, करंदी (सोललेली) : ३२०, भिंग : २४०, पाला : ५५०-१२००, वाम : १२०-६००, ओले बोंबील : १२०-१८०. कोळंबी : 
लहान : २८०, मोठी : ४४०, जम्बो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : १८०-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०. 
खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ३६०, तांबोशी : ४४०, पालू : ३२०, लेपा : १६०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १४०-२००, पेडवी : १००, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १८०, खुबे : १६०, तारली : १२०.  
 
नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०-२००, मरळ : ४००, शिवडा : २००, चिलापी : ६०, मांगूर : १५०, खवली : २००,  आम्ळी : १००, खेकडे : २४०, वाम : ५००. 
मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०. चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०. 
अंडी : गावरान : शेकडा : ६१०, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३५० डझन : ४८ प्रतिनग : ४.
 
गुढीपाडवा आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध फुलांना मागणी वाढल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली हाेती. फुलांचे दर (प्रतिकिलो) ः झेंडू : २०-६०, गुलछडी : २००-३००, बिजली : २०-६०, कापरी : २०-५०, माेगरा ५००-६००, अॅस्टर : १०-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : २०-३०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : २०-३०, लिलिबंडल : ८-१५, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ४०-८०.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...