पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत

पुणे बाजारसमितीतील हिरवी मिरची आवक
पुणे बाजारसमितीतील हिरवी मिरची आवक
पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २९) भाजीपाल्याची आवक सुमारे १६५ ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे आवक कमी असून, लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आले, काकडी, श्रावण घेवडा यांच्या दरात वाढ झाली. हिरवी मिरची, गवार, भुईमूग शेंगांची आवक वाढली. लग्नसराईमुळे फुलांना मागणी असल्याचे सांगण्यात आले. 
भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबीची, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेंपाे हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ ते ६ टेंपो शेवग्याची, कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे ८ ते १० टेंपाे आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली. आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव भागातून बटाट्याची सुमारे ६५ ट्रक आवक झाली.
पुणे विभागातून झालेल्या स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे १२०० गोणी, टेमॅटोची ६ हजार क्रेट, फ्लॉवरची सुमारे २० टेंपो, कोबीची १५ टेंपो, तांबडा भोपळ्याची १० टेंपो, भेंडीची १२ तर गवारीची प्रत्येकी सुमारे १० टेंपो, ढोबळी मिरचीची १०, हिरवी मिरचीची ८ टेंपो, गावरान कैरीची १५ टेंपो, काकडीची ९ टेंपाे, भुईमूग शेंगांची १५० गाेणी, गाजराची ७ टेंपाे इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे भाव (प्रतिदहा किलो) : कांदा : ६५-८५, बटाटा : १४०-१७०, लसूण : १००-३००, आले : सातारी : ५५०-६००, भेंडी : १५०-२५०, गवार : २००-३००, टोमॅटो : ४०-५०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १००-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : १००-२००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :२००-२२०, पापडी : २००-२५०, पडवळ : १७०-१८०, फ्लॉवर : ३०-६०, कोबी : ३०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२५०, गाजर : ६०-१००.
वालवर : २००-२५०, बीट : ४०-६०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसाळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ५००, मटार : परराज्य : ७००-७५०, तांबडा भोपळा : ५०-१००, कैरी : तोतापुरी : १५०-१६०, गावरान : १००-१५०, चिंच : (अखंड) : ३००-३२०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२४०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे १ लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१५००, मेथी : ५००-१२००, शेपू : १०००-१३००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ४००-७००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-७००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-६००.
फळबाजारात मोसंबीची ५० टन, संत्रीची ३ टन, डाळिंबाची सुमारे ३५ ते ४० टन, पपईची सुमारे ३ टेंपोे, लिंबाची सुमारे ६ हजार गोणी, चिकूची २ हजार बॉक्स, पेरुची १०० क्रेट्स, कलिंगडाची सुमारे ३० टेंपो, खरबुजाची २० टेंपो, कर्नाटकमधून आंब्याच्या विविध जातींच्या सुमारे ५० हजार बॉक्स आणि पेट्या तर रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे १२ हजार पेट्या आवक झाली हाेती. 
फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : २००-८००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : ( ३ डझन) २००-३५०, (४ डझन) : ५०-१८०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ३०-११०, गणेश ५-२५ आरक्ता १०-४० कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, आंबा : रत्नागिरी हापूस (४-८ डझन) १०००-२०००.
फुलांचे दर (प्रति किलो) ः झेंडू : २०-६०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : ३०-६०, कापरी : २०-६०, अॅस्टर : १५-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १५-४०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लिली बंडल : ३-६, जरबेरा : ६०-१००, कार्नेशियन : १२०-२००, मोगरा : २००-४००.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ ते १० टन, खाडीची सुमारे ३०० किलो, नदीची सुमारे २ टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला, सिलनची सुमारे १२ टन आवक झाली हाेती. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने मासळीच्या दरातील तेजी कायम आहे. 
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १६००-१७००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १२००, लहान : ९०० भिला : ७००, हलवा : ७००, सुरमई : ६५०-७५०, रावस-लहान : ७००, मोठा : ८००, घोळ : ७००, करली : ३२०, करंदी : सोललेली : ३२०, भिंग : ४००, पाला : ६००-१२००, वाम : ४००-६००, ओले बोंबील : २००.
कोळंबी : लहान : ३६०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १५००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४००-४८०.
खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : २००-४८०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १६०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान : १६०-२००, पेडवी : ८० बेळुंजी : १४०, तिसऱ्या : २०० खुबे : १६० तारली : १२०.
नदीची मासळी : रहू : २४०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २४०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १८०, आम्ळी : १०० खेकडे : १६०, वाम : ५५०.
मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०. चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ६२०, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३७८ डझन : ४८, प्रतिनग : ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com