agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

पुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. आवक घटल्याने सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात असलेली तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.

पुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. आवक घटल्याने सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात असलेली तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.

भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबीची, ओडिशा, कर्नाटक, गुजरातमधून १४ ते १५ टेंपाे हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ ते ६ टेंपो शेवग्याची, कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे ७ ते ८ टेंपाे आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडे चार हजार गोणी आवक झाली. आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव भागातून बटाट्याची सुमारे ५५ ट्रक आवक
 झाली.

पुणे विभागातून झालेल्या स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १४०० गोणी, टोमॅटोची साडेपाच हजार क्रेट, फ्लॉवरची सुमारे १२ ते १३ टेंपो, कोबीची १५ ते १६ टेंपो, तांबडा भोपळ्याची १० ते १२ टेंपो, भेंडीची ७ ते ८ तर गवारीची प्रत्येकी सुमारे ३ ते ४ टेंपो, ढोबळी मिरचीची १० ते १२ टेंपो, हिरवी मिरची ५ ते ६ टेंपो, गावरान कैरीची १० ते १२ टेंपो, भुईमूग शेंगांची २५० गाेणी इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे भाव (प्रतिदहा किलो) : कांदा : ६०-८५, बटाटा : १३०-१८०, लसूण : १००-३००, आले : सातारी : ५००-५००, भेंडी : २००-३००, गवार : २००-४००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : १५०-२००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ४०-७०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२५०, गाजर : ५०-१००, वालवर : २००-२५०, बीट : ६०-८०, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसाळे : १००-१५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ६००, मटार : परराज्य : ६००-६५०, तांबडा भोपळा : ४०-८०, कैरी : तोतापुरी : १२०-१६०, गावरान : १००-१२०, चिंच : (अखंड) : ३००-३५०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२४०, मका कणीस : ८०-१५०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे १५ हजार तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१८००, मेथी : ८००-१२००, शेपू : १०००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ८००-१०००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-६००.

फळबाजारात मोसंबीची ३० टन, संत्रीची २ टन, डाळिंबाची सुमारे २५ ते ३० टन, लिंबाची सुमारे ५ ते ६ हजार गोणी, चिकूची २ हजार बॉक्स, पेरूची ३०० क्रेट्स, कलिंगडाची सुमारे २५ ते ३० टेंपो, खरबुजाची १० ते १५ टेंपो, कर्नाटकमधून आंब्याच्या विविध जातींच्या सुमारे ४० हजार बॉक्स आणि पेट्या तर रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली हाेती.

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : १००-३००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : गावरान (३ डझन) : २५०-४२०, (४ डझन) : ८०-२६०, संत्रा : (३ डझन) २५०-४५०, (४ डझन) : १६०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-२५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, आंबा : रत्नागिरी हापूस (४-८ डझन) ६००-१५००, कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन) ४०० ते ७००, लालबाग (१ किलो) १५- २५, बदाम (१ किलो) २०-३०, पायरी (४ डझन) ३००-५००.

फुलांचे दर (प्रति किलो) : झेंडू : १०-४०, गुलछडी : १०-३०, कापरी : २०-४०, अॅस्टर : १२-२४, गलांड्या : ३-६, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ५-१५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : २०-६०, लिली बंडल : १-५, जरबेरा : ५-२०, कार्नेशियन : २०-५०, मोगरा : १००-२००.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी आवक घटल्याने मासळीचे दर वधारले होते. बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ ते ९ टन, खाडीची सुमारे १५० किलो, नदीची सुमारे दोन ते अडीच टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला, सिलनची सुमारे १२ ते १३ टन आवक झाली हाेती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : १०००, लहान : ७५०, भिला : ६००, हलवा : ७५०, सुरमई : ७००-८००, रावस लहान : ७००-८००, मोठा : ८००, घोळ : ७५०, करली : ३६०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग : ४००, पाला : ६००-१२००, वाम : २००-५५०, ओले बोंबील : २००. कोळंबी : लहान : ३००, मोठी : ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १५००, मोरी : २००-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४००-४८०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २८०, नगली : ३२०-४८०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १८०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १६०-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : २००, खुबे : १६०, तारली : १२०.
नदीची मासळी :  रहू : १८०, कतला : १८०, मरळ : ४८०, शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, मांगूर : १६०, खवली : २४०,  आम्ळी : १२०, खेकडे : १८०, वाम : ५५०.
मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.

चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ६३०, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३९५ डझन : ५४, प्रतिनग : ४.५०.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...