बाजारभाव
बाजारभाव

पुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर वधारले

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २७) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक कमीच असून, पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारली, दाेडका, फ्लाॅवर, सिमला मिरची, शेवगा आणि पावट्याचा समावेश आहे.

भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून सुमारे ४ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात ४ ट्रक कोबी, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून १२ टेंपाे हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ टेंपो शेवगा आवक झाली हाेती. तर कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे १० टेंपाे आवक झाली हाेती. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ४ हजार गोणी आवक झाली. आग्रा, इंदूर आणि तळेगाव भागांतून बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टोमॅटो साडेपाच हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० टेंपो, कोबी १५ टेंपो, तांबडा भोपळा १५ टेंपो, भेंडी १० तर गवार सुमारे ६ टेंपो, ढोबळी मिरची १२ तर गावरान कैरी १५ टेंपो, काकडी १० टेंपाे, भुईमूग शेंग सुमारे २५० गाेणी आवक बाजार समितीमध्ये झाली हाेती.

फळभाज्यांचे भाव (प्रति दहाकिलो) : कांदा : ६०-८५, बटाटा : १३०-१७०, लसूण : १००-२५०, आले : सातारी : ५००-५५०, भेंडी : २००-३००, गवार : सुरती २००-४००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी :२००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३००-४००, गाजर : ८०-१५०, वालवर : २५०-३००, बीट : ४०-६०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : १६०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ६५०-७००, मटार : परराज्य : ४८०-५००, तांबडा भोपळा : ४०-८०, कैरी : तोतापुरी : १२०-१४०, गावरान : ७०-१४०, चिंच : (अखंड) : ३००-३२०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे ९० हजार, तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) ः कोथिंबीर : ७००-१८००, मेथी : ८००-१६००, शेपू : १०००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-८००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १००-१५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-७००.

फळबाजारात मोसंबी २१ टन, संत्री १ टन, डाळिंब सुमारे ३५ टन, पपई १५ टेंपोे, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, चिकू एक हजार डाग, पेरू १०० क्रेट, कलिंगड सुमारे २५ टेंपो, खरबूज २० टेंपो, काेकणातून हापूसचे सुमारे ५ हजार, तर कर्नाटकातून विविध जातींचे सुमारे २० हजार बाॅक्स, करंड्यांची आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-३००, मोसंबी : मद्रास:  (३ डझन) : २६०-४५०, (४ डझन ) : १५०-२५०, संत्रा : ( ३ डझन) ३००-५००, (४ डझन) : १८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश १०-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२०, पपई  : ५-२५, चिकू : (१० किलाे) १००-७००, पेरू (२० किलो) : ३००-५००, रत्नागिरी हापूस : कच्चा (४ ते ८ डझन) ५००-१२००, तयार (४ ते ७ डझन) ७००-१४००. स्थानिका मुळशी हापूस प्रति डझन -१००-२५० फुलांचे दर (प्रतिकिलो) ः झेंडू : ३०-६०, गुलछडी : १६-३०, कापरी : २०-४०, अॅस्टर : १५-३०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिलीबंडल : १-३, जरबेरा : ५-२०, कार्नेशियन : २०-५०, मोगरा : १००-२००

गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २७) खोल समुद्रातील सुमारे १० टन, खाडीची सुमारे ४०० किलो, नदीची सुमारे २ टन आवक झाली हाेती. तर आध्रप्रदेशातुन रहू, कतला सिलनची सुमारे १४ टन आवक झाली हाेती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) ः पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १५००, मध्यम : १०००-११००, लहान : ७५० भिला : ६००, हलवा : ५५०, सुरमई : लहान ५५०-६०० मध्यम ६००-७००, रावस-लहान : ७००, मोठा : ९००, घोळ : ६५० ७०० करली : ३२०-३६०, करंदी : ३६० भिंग : ४००, पाला : ६००-१४००, वाम : पिवळी ४०० काळी ६००, ओले बोंबील : १४०-२००.

कोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २८०-४८०, मांदेली : १२०-१४० राणीमासा : २४०, खेकडे : २०० चिंबोऱ्या : ३६०-४८०. खाडीची मासळी ः- सौंदाळे : २८०, खापी : २००-२८०, नगली : ४००, तांबोशी : ४४०, पालू : २८०, लेपा : २००, शेवटे : १८०-२८० बांगडा : लहान : १४०, मोठे : २०० ,पेडवी : ६०, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : २०० खुबे : १६०, तारली : १२०

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०, मरळ : ३६०-४८०, शिवडा : २०० चिलापी : ६०, मागूर : १४०, खवली : २००, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ५२०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com