agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. भाजीपाल्यांच्या सरासरी आवकेच्या तुलनेत सुमारे ५० ट्रक भाजीपाल्याची आवक कमी झाली हाेती. यामध्ये स्थानिक आवक कमी झाली हाेती. शेतकरी संपामुळे वाहन चालकांनी वाहनांच्या नुकसानीच्या भीतीने शेतमाल आणला नसल्याने आवक मंदावली हाेती. परिणामी, बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यत वाढ झाली हाेती.

पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. भाजीपाल्यांच्या सरासरी आवकेच्या तुलनेत सुमारे ५० ट्रक भाजीपाल्याची आवक कमी झाली हाेती. यामध्ये स्थानिक आवक कमी झाली हाेती. शेतकरी संपामुळे वाहन चालकांनी वाहनांच्या नुकसानीच्या भीतीने शेतमाल आणला नसल्याने आवक मंदावली हाेती. परिणामी, बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यत वाढ झाली हाेती. यामध्ये प्रामुख्याने कांदा, आले, गवार, भेंडी, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, शेवगा, काकडी, फ्लॉवर, गाजर, घेवडा आदींचा समावेश आहे.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये प्रामुख्याने इंदौरहून २ टेम्पो गाजराची, गुजरात आणि कर्नाटकातून सुमारे ५ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवग्याची, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून १० टेम्पो हिरवी मिरचीची, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटारची, कर्नाटकातून ८ टेम्पो ताेतापुरी कैरीची आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे १ हजार ४०० गाेणी, टॉमेटोची सुमारे २ हजार ५०० क्रेट, फ्लॅावर आणि काेबीची प्रत्येकी सुमारे १२ टेम्पो, भुईमूग शेंगांची सुमारे १७५ पोती, सिमला मिरचीची १० टेम्पो, भेंडी आणि गवारीची प्रत्येकी सुमारे ६ टेम्पो, गावरान कैरीची १० टेम्पो आवक झाली हाेती. कांद्याची सुमारे ६० ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिक येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेचार हजार गोणीची आवक झाली हाेती

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः कांदा : १००-१४०, बटाटा : १३०-१७०, लसूण : १००-३००, आले सातारी : ५५०-५८०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती २५०-५००, टोमॅटो : २००-२५०, दोडका : ३५०-५००, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : ६०-१५०, चवळी : २००-३००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ५०-८०, वांगी : १५०-३५०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १४०-१५०, शेवगा : ४५०-५५०, गाजर : १००-१६०, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१२०, घेवडा : १०००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २८०-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : ५५०-६००, पावटा : ७००, भुईमूग शेंग - ३००-३५०, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : ३२०-३५०, मका कणीस : ६०-१५० (१० किलो) नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख जुड्या तर मेथीची अवघी १५ हजार जुडीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा)  ः कोथिंबीर : ८००-१४००, मेथी : १५००-२२००, शेपू : ५००-१०००, कांदापात : ५००-१५००, चाकवत : ८००- १०००, करडई : ५००-८००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-७००, चुका : ७००-८००, चवळई : ५००-८००, पालक : ५००-७००.

फळबाजारात रविवारी (ता. ३) लिंबाची सुमारे २ हजार गाेणी, डाळिंबाची सुमारे ३० टन, माेसंबीची सुमारे २० टन, संत्राची २ टन, पपईची ३ टेम्पाे, कलिंगडाची २० टेम्पाे, खरबुजाची १५ टेम्पाे, चिक्कूची सुमारे २ हजार बाॅक्स, रत्नगिरी येथून हापूस आंब्याची सुमारे ५०० पेट्या तर कर्नाटकातून आंब्याच्या विविध वाणांची सुमारे २० हजार बॉक्स आणि पेट्यांची आवक झाली हाेती.

रत्नागिरी हापूसच्या हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, पुढील रविवार पासून आवक बंद हाेण्याची शक्यता आडत्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे जुलै आॅगस्ट पर्यत गुजरातच्या केशर आंब्याचा हंगाम जाेर धरण्याची शक्यता आहे.

लिंबे (गाेण) २००-५००, डाळिंब (प्रतिकिलाे) आरक्ता १०-४०, गणेश ५-२५, भगवा २०-८०, माेसंबी (३ डझन) २२०-४५०, (४ डझन) १२०-२२०, संत्रा (३ डझन) ३२०-४५०, (४ डझन) १००-२५०, पपई (प्रति किलाे) १०-२०, चिक्कू (१० किलाे) १००-६००, पेरू (२० किलाे) ५००-७००, कलिंगड (किलाे) १०-१५, खरबूज (१०-२२) रत्नागिरी हापूस प्रतिडझन २००-४००, कर्नाटक हापूस (४ डझन) ४००-६००, (५ डझन) ४००-५००, प्रतिकिलाे २५-३५, पायरी (४ डझन) ३००-४००, किलाे १५-२५, लालगाब (प्रतिकिलाे)- १५-२० बदाम-१५-२०, मल्लिका २०-२५, गुजरात आणि महाराष्ट्र केशर प्रतिकिलाे २५ ते ६० रुपये.

मॉन्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. १ जून पासून मच्छीमार बाेटी किनाऱ्यावर आल्या असून, परत येणाऱ्या होड्यांमधून मासळीची आवक होत आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने मासळीच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मासळीच्या आवकेत खोल समुद्रातील अवघी एक टन, खाडीची २०० किलो, नदीची २ टन आणि आंध्र येथून रहू, कतला सिलनची २ टन आवक झाली हाेती. तर रमजानच्या उपवासांमुळे इंग्लिश अंड्यांना मागणी वाढली असल्याने इंग्लिश अंड्यांच्या शेकड्याच्या दरात १० रूपयांनी वाढ झाली. तर चिकनचे दर स्थिर आहेत.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) ः पापलेट : कापरी : १६००, मोठे : १६००, मध्यम : १०००-, लहान : ७५०-८००, भिला : ४८०, हलवा : ७००, सुरमई : लहान  ५५० मध्यम  ६००-७००, रावस-लहान : ५५०, मोठा : ६८०, घोळ : ५२०, करली : २८०, भिंग : ४००, पाला : ७५०, वाम : पिवळी ६८० काळी ३८०, ओले बोंबील : लहान १४०  मध्यम १६० कोळंबी ः लहान : २४०, मोठी : ५५०, जंबोप्रॉन्स : ८५०, किंगप्रॉन्स : ६५०-७५०, लॉबस्टर : १३००, मोरी : ३२०, मांदेली : १४० राणीमासा : २४०, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४४०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २८०, नगली : ३६०, तांबोशी : ५००, पालू : २८०, लेपा : २००, शेवटे : २८० बांगडा : लहान : १८०, मोठे : २००, पेडवी : १४०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : २०० खुबे : १६०, तारली : १६०.

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०, मरळ : ३६०-४८०, शिवडा : २०० चिलापी : ६०, मागुर : १४०, खवली : २००, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ५२०. मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.

चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ६३०, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ४१९ डझन : ६० प्रतिनग : ५.

फुलांचे दर (प्रति किलाे) : झेंडू -५०-११०, गुलछडी १५-३०, बिजली १००-२००, कापरी ५०-६०, शेवंती १००-१५०, माेगरा ८०-१८०, ॲस्टर (चार गड्डी) १५-३०, गलांड्या ६-१५, गुलाबगड्डी (१२ नगाचे दर) १०-२०, ग्लॅडिएटर १०-२०, गुलछडी काडी २०-५०, डच गुलाब (२० नग) ३०-८०, लिलिबंडल (५० काडी) २-३, जर्बेरा १०-२०, कार्नेशन ३०-१००.

इतर बाजारभाव बातम्या
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक कमी,...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ४५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा,...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
चिंचेचे दर दबावातसरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी)...
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीतजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३०००...नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक :...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३०...सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी...
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात...परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची...
गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍यजळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये...
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक...