सांगली येथे कोल्हापुरी गूळ २५०० ते ३६७५ रुपये क्विंटल

गुळ
गुळ
सांगली  ः येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. ८) कोल्हापूरी गुळाची ३१०९ क्विंटल झाली. कोल्हापुरी गुळाला २५०० ते ३६७५ रुपये तर सरासरी ३०८८ रुपये क्विंटल असा दर होता.
 
हळदीची आवक वाढू लागल्याने दिवसातून दोन वेळा सौदे सुरू झाले आहेत. राजापुरी हळदीची ७२२३ क्विंटल आवक झाली. या हळदीस ६५०० ते १३,१०० रुपये तर सरासरी ९८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. परपेठी हळदीची ९५ क्विंटल आवक झाली. परपेठ हळदीस ६५०० ते ८६७५ रुपये तर ७५८८ रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
 
विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ३२४५  क्विंटल आवक झाली होती. कांद्यास २०० ते ९०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची ९४५ क्विंटल आवक झाली. बटाट्यास १००० ते १८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.
 
चिकूची १८३० डझन आवक झाली. चिकूला प्रतिदहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. डाळिंबाची १२४५ डझन आवक झाली होती. डाळिंबास २०० ते ४०० रुपये रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. आंब्याची २२४५ पेटी (चार डझनाची पेटी) आवक झाली. आंब्याच्या प्रतिपेटीस १००० ते २००० रुपये असा दर मिळाला. कलिंगडाची ४७५ डझन आवक झाली. कलिंगडास प्रति डझन ५० ते ४०० रुपये असा दर होता. आंब्याची ४६४५ बॉक्‍स (एक डझनाचे बॉक्‍स) आवक झाली. त्यास ३०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com