सांगलीत हळद ६००० ते ११००० रुपये क्विंटल

हळद
हळद
सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २९) हळदीची ४६५७ क्विंटलची आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ११००० तर सरासरी ८५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली
 
कोल्हापुरी गुळाची १४१८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ३२००, तर सरासरी २८०० रुपये असा दर मिळाला. परपेठ हळदीची ३४६६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ७२२५ तर सरासरी ५६१३ असा दर मिळाला.
 
विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम 
बाजार आवारात कांद्याची १२३० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १०० ते ९०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची ६०७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये असा दर होता. 
लसणाची ८० क्विंटलची आवक झाली. लसणास प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची २०० डझन आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३० ते ४०० रुपये असा दर होता.
 
चिकूची ७० डझन आवक झाली. चिकूस प्रति दहा किलोस १०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. आंबा बॉक्‍स (एक डझन) ६४५२ बॉक्‍सची आवक झाली असून, त्यास प्रति बॉक्‍सला १०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची ५१ पेटीची आवक झाली 
असून, त्यास प्रति पेटीस १५०० ते २००० असा दर मिळाला. आंबा पेटी (चार डझन) ४४९१ पेट्यांची आवक झाली असून, त्यास प्रति पेटीस ३०० ते १००० रुपये असा दर होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com