agriculture news in marathi, commodity rates in market committee, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १५) मेथी, कोथिंबीर, गवार, दोडक्‍याचे दर तेजीत होते. काकडी व शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. मेथीची ३ हजार जुड्या आवक झाली. मेथीस शेकड्यास ५०० ते ७०० रुपये दर मिळाला आहे. मेथीच्या दरात मंगळवारच्या (ता. १३) तुलनेत  शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
 
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १५) मेथी, कोथिंबीर, गवार, दोडक्‍याचे दर तेजीत होते. काकडी व शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. मेथीची ३ हजार जुड्या आवक झाली. मेथीस शेकड्यास ५०० ते ७०० रुपये दर मिळाला आहे. मेथीच्या दरात मंगळवारच्या (ता. १३) तुलनेत  शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
 
बाजार समितीत कोथिंबिरीची ३२०० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास २०० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. कोथिंबिरीच्या दरात शेकड्यामागे १०० रुपयांनी वाढ झाली. फळभाज्यांमध्ये गवारीची तीन क्विंटल आवक झाली. गवारीस ४०० ते ६०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. दोडक्‍याची नऊ क्विंटल आवक झाली. 
दोडक्‍यास २०० ते ३०० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला आहे.
 
वाटाण्याची २३ क्विंटल आवक झाली. वाटाण्यास ३०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. कांद्याची ६७५ क्विंटल आवक झाली. कांद्यास ७० ते ९० रुपये दहाकिलो असा दर मिळाला. बटाट्याची ६३५ क्विंटल आवक झाली. बटाट्यास ८० ते १३० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. लसणाची ६४ क्विंटल आवक झाली. लसणास १०० ते २५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला.
 
आल्याची ७५ क्विंटल आवक झाली. दहा किलो आल्यास २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. हिरवी मिरचीची १२ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २८० ते ३२० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. पावट्याची चार क्विंटल आवक झाली. पावट्यास ३०० ते ४०० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. काळा घेवड्याची नऊ क्विंटल आवक झाली. या घेवड्यास २०० ते २५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला.
 
टोमॅटोची ४० क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ४० ते ५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. शेवग्याची १८ क्विंटल आवक झाली. शेवग्यास २०० ते २५०  रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. काकडीची २७ क्विंटल आवक झाली. काकडीला ४० ते ६० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...