agriculture news in marathi, commodity rates in market committee, solapur, maharashtra | Agrowon

सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. १०) मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली. त्यांचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. १०) मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली. त्यांचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात शनिवारी भाज्यांची आवक तशी जेमतेम राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार काहीसा थंड होता. पण शनिवारी आवक आणि दरही वाढण्याची शक्‍यता होती. पण आवकही कमीच आणि दरही जैसे थे राहिले. पालेभाज्यांची आवक प्रत्येकी ५ ते ९ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ७०० रुपये, शेपूला ३०० ते ५५० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. 

बाजारात हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या दराची परिस्थितीही फारशी तेजीची नव्हती. त्यांचे दरही स्थिरच राहिले. हिरव्या मिरचीची आवक १०, वांग्याची २० आणि टोमॅटोची ५०  क्विंटल राहिली. गवार, भेंडी, दोडका यांच्या दरातील तेजी मात्र शनिवारीही कायम राहिली. त्यांची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटल अशी होती. गवारला २०० ते ४०० रुपये, भेंडीला १५० ते ३०० रुपये आणि दोडक्‍याला १८० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. कांद्याची आवकही १०-१२ गाड्यापर्यंत जेमतेम राहिली. कांद्याला ३०० ते १६०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत गाजर प्रतिक्विंटल १२०० ते १५००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
कोल्हापुरात आंब्यांच्या आवकेस सुरवातकोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डात कोकणी...
जळगावात आल्याला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची...
स्थानिक आवक कमी; भेंडी, टोमॅटोच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदेबाग केळीची आवक घटली; दर टिकूनजळगाव ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव भागातील कांदेबाग...
लासलगावात लाल कांदा प्रतिक्विंटल ३०० ते...लासलगाव : गतसप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर...
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल २५०० ते ३५००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो २०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या...नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली...
पुणे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली;...पुणे : आवक वाढूनही मागणी कमी राहिल्याने सर्व...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
कांद्याच्या बाजारातील चढउताराचा...जळगाव : खानदेशात कांद्याची आवक बाजारांमध्ये...
जळगावात चवळी प्रतिक्विंटल २५०० ते ४०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...