औरंगाबाद येथे ढोबळी मिरची ३००० ते ३७०० रुपये क्विंटल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) ढोबळी मिरचीची ३७ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला ३००० ते ३७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची ४० क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. कांद्याची ३४५ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला २०० ते १२०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. टोमॅटोची १६४ क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला १००० ते १८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. वांग्याची आवक ३२ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला १००० ते १२०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. भेंडीची २३ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. काकडीची १०२ क्‍विंटल आवक झाली. काकडीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.

बाजारसमितीत लिंबाची १५ क्‍विंटल आवक झाली. लिंबाचे दर ५०० ते ६०० रुपये क्‍विंटल राहिले. कारल्याची ३२ क्‍विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला.कोबीची ९३ क्‍विंटल आवक झाली. कोबीला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले. फ्लॉवरची ३७ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. शेवग्याची ४ क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला ३००० ते ५००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कैरीची १४३ क्‍विंटल आवक झाली. कैरीला ३०० ते १५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.

बाजारसमितीत मेथीची ११ हजार जुड्या आवक झाली. मेथीचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. पालकाची ९ हजार जुड्या आवक झाली. पालकला ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची १५ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला ८०० ते १००० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com