परभणीत गवार २००० ते ३००० रुपये क्विंटल

गवार
गवार
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३०) गवारीची १० क्विंटल आवक झाली. गवारीला २००० ते ३००० रुपये क्विंटल असे दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये सध्या स्थानिक परिसरातून टोमॅटो, काकडी, फ्लाॅवर, कोबीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. तेलंगणातील सिद्धीपेठ भागातून हिरव्या मिरचीची, तर बीड जिल्ह्यातून ढोबळ्या मिरचीची आवक होत आहे.
 
मार्केटमध्ये शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ५ क्विंटल आवक झाली. चवळीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. वालाची ६ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक झाली. पालकाला ८०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. चुक्याला १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्या आवक असताना प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक झाली. शेपूला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला ६००  ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
वांग्याची ४० क्विंटल आवक होती. वांग्याला ८०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. कैरीची ६० क्विंटल आवक होती. कैरीला २००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com