आवक घटल्याने पुण्यात भाजीपाला तेजीत

बटाटा आवक
बटाटा आवक
पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १३) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे आवक घटल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, घेवडा, बीट, पावटा या भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 
 
भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबीची, ओडिशा, कर्नाटक, गुजरातमधून १४ ते १५ टेंपाे हिरवी मिरचीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ४ ते ६ टेंपो शेवग्याची, कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे ७ ते ८ टेंपाे आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली. आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव भागातून बटाट्याची सुमारे ५५ ट्रक आवक झाली.
 
पुणे विभागातून झालेल्या स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १७०० ते १८०० गोणी, टोमॅटोची ५ ते ६ हजार क्रेट, फ्लॉवरची सुमारे १५ टेंपो, कोबीची १६ टेंपो, तांबडा भोपळ्याची १० ते १२ टेंपो, भेंडीची १० ते १२ तर गवारीची प्रत्येकी सुमारे ५ ते ६ टेंपो, ढोबळी मिरचीची १० ते १२ टेंपो, हिरवी मिरची ७ ते ८ टेंपो, गावरान कैरीची ८ ते १० टेंपो, भुईमूग शेंगांची १५० गाेणी इतकी आवक झाली.
 
फळभाज्यांचे भाव (प्रतिदहा किलो) :  कांदा : ५०-८५, बटाटा : १३०-१७०, लसूण : १००-२५०, आले : सातारी : ५८०-६००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-१८०, काकडी : १४०-१५०, कारली : हिरवी ३००-३२०, पांढरी : २००-२२०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ५०-७०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१२०, ढोबळी मिरची : २००-२२०, तोंडली : कळी २५०, जाड : १००-१२०, शेवगा : २५०, गाजर : ८०-१२०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ५००-५५०, मटार : परराज्य : ६००-६५०, तांबडा भोपळा : ४०-८०, कैरी : तोतापुरी : १६०-१८०, गावरान : ८०-१५०, चिंच : (अखंड) : ३००-३२०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 
 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे १ लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१३००, मेथी : ५००-११००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१६००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-१०००, चवळई : ३००-६००, पालक : ५००-६००. 
 
फळबाजारात मोसंबीची ४५ टन, संत्रीची ४ टन, डाळिंबाची सुमारे ३० ते ३५ टन, लिंबाची सुमारे ६ ते ७ हजार गोणी, चिकूची २ हजार बॉक्स, पेरुची १०० क्रेट्स, कलिंगडाची सुमारे २५ ते ३० टेंपो, खरबुजाची १५ ते २० टेंपो, कर्नाटकमधून आंब्याच्या विविध जातींच्या सुमारे २० हजार बॉक्स आणि पेट्या तर रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली हाेती.
 
फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : २००-७००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : गावरान (३ डझन) : २२०-३५०, (४ डझन) : ७०-२००, मद्रास (३ डझन) : २००-४००, (४ डझन ) : १००-२५०, संत्रा : ( ३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ६०-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश १०-२०, आरक्ता १०-३५. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२५, पपई  : ५-२०, चिक्कू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-४५०, आंबा : रत्नागिरी हापूस (४-८ डझन) १०००-१८००, कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन) ५०० ते ९००, लालबाग (१ किलो) २०- ३०, बदाम (१ किलो) २०-३०, पायरी (४ डझन) ४००-६००.
 
फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : २०-४०, गुलछडी : ४०-८०, कापरी : १०-४०, अॅस्टर : १०-१६, गलांड्या : ३-६, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १५-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : २-५, जरबेरा : २०-५०, कार्नेशियन : १००-१५०, मोगरा : १००-२००.
 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ ते १४ टन, खाडीची सुमारे २००-२५० किलो, नदीची सुमारे दोन ते अडीच टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला, सिलनची सुमारे १४ ते १५ टन आवक झाली हाेती.
 
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १५००, मध्यम : ११००, लहान : ७५०-८५०, भिला : ६००, हलवा : ७००, सुरमई : ७००, रावस लहान : ६५०, मोठा : ८५०, घोळ : ६००, करली : ३६०, करंदी ( सोललेली ) : २८०, भिंग : २८०, पाला : ६००-१२००, वाम : ३६०-६००, ओले बोंबील : १२०-२००. कोळंबी : लहान : ३२०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १५००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १४०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०.
 
खाडीची मासळी :  सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ४००, तांबोशी : ४४०, पालू : २८०, लेपा : १६०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १६०-२००, पेडवी : ६०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : २००, खुबे : १६०, तारली : १२०.
नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १८०, मरळ : ३२०-४८०, शिवडा : २००, चिलापी : ६०, मांगूर : १५०, खवली : २००,  आम्ळी : १२०, खेकडे : २००, वाम : ५५०.
 
मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०. चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ६२०, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३६० डझन : ४८, प्रतिनग : ४.
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com