agriculture news in marathi, commodity rates in market committee,sangli, maharashtra | Agrowon

सांगलीत हळद ६००० ते १५,००० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018
सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १४) हळदीची १४ हजार ३०४ क्विंटल आवक झाली. हळदीला ६००० ते १५,००० रुपये, तर सरासरी १०,५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १४) हळदीची १४ हजार ३०४ क्विंटल आवक झाली. हळदीला ६००० ते १५,००० रुपये, तर सरासरी १०,५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 
बाजार समितीच्या आवारात कोल्हापुरी गुळाची १९२२ क्विंटल आवक झाली. गुळास २८०० ते ४१७१ रुपये, तर सरासरी ३४८६ रुपये क्विंटल दर होता. लाल मिरचीची आवक कमी अधिक प्रमाणात होती. लाल मिरचीची ३१६ क्विंटल आवक झाली. या  मिरचीला ९००० ते १०,००० रुपये, तर सरासरी ९५०० रुपये क्विंटल दर मिळाला. परपेठ हळदीची ६२२१ क्विंटल आवक झाली. या हळदीला ५७०० ते ८००० रुपये सरासरी ६५५० रुपये क्विंटल दर होता.
 
विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम आवारात कांद्याची ३०५२ क्विंटल आवक झाली. कांद्याला २०० ते १००० रुपये क्विंटल दर होता. बटाट्याची १०७५ क्विंटल आवक झाली. बटाट्याला ७०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाला. लसणाची ९१ क्विंटल आवक झाली. लसणास २००० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. 
 
फळांमध्ये मोसंबीची ७०० डझन आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर होता. डाळिंबाची २२३० डझन आवक झाली. डाळिंबास प्रति दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. चिकूची ९५६० डझन आवक झाली होती. चिकूला प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. द्राक्षाची ८२८ (चार किलोची पेटी) पेटींची आवक झाली. द्राक्षाच्या प्रति पेटीस ८० ते १२० रुपये दर मिळाला. आल्याची १३ क्विंटल आवक झाली. आल्यास १५०० ते २५०० रुपये क्विंटल असा दर होता.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...