agriculture news in marathi, Companies and retailer both are bonded for compensation say agri Sec | Agrowon

बियाणे कंपन्या ते रिटेलर; सर्वच भरपाईसाठी बांधील : कृषी सचिव
विनोद इंगोले
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

नागपूर : तंत्रज्ञान पुरवठादार (मोन्सॅन्टो) आणि बियाणे कंपन्या यांच्यात करार झाला. त्यापोटी मोन्सॅन्टोला ४९ रुपये प्रतिपाकीट रॉयल्टी मिळाली, परंतु या कराराशी सामान्य शेतकऱ्यांना देणे घेणे नाही. शेतकरी आणि रिटेलर हे बियाणे घेताना दुवा ठरतात. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या आणि रिटेलर असे सर्वच या साखळीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास बांधील ठरतात, असे स्पष्टीकरण कृषी सचिव विजयकुमार यांनी दिले. 

नागपूर : तंत्रज्ञान पुरवठादार (मोन्सॅन्टो) आणि बियाणे कंपन्या यांच्यात करार झाला. त्यापोटी मोन्सॅन्टोला ४९ रुपये प्रतिपाकीट रॉयल्टी मिळाली, परंतु या कराराशी सामान्य शेतकऱ्यांना देणे घेणे नाही. शेतकरी आणि रिटेलर हे बियाणे घेताना दुवा ठरतात. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या आणि रिटेलर असे सर्वच या साखळीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास बांधील ठरतात, असे स्पष्टीकरण कृषी सचिव विजयकुमार यांनी दिले. 

राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ३० हजार रुपयांची मदत जाहीर केली. यातील १६ हजार रुपये कंपन्यांकडून वसूल केले जाणार आहेत. नॅशनल सीड असोसिएशनने याला हरकत घेत न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. ‘‘बियाण्यांची उगवणशक्‍ती योग्य होती, त्याला बोंडही योग्य प्रमाणात लागली. त्यानंतर तंत्रज्ञान अपयशी ठरल्याने त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यात बियाणे कंपन्या नाही; तर तंत्रज्ञान पुरवठादार दोषी असल्याचे सिद्ध होते. परिणामी तंत्रज्ञान पुरवठादाराकडून ही वसुली व्हावी,’’ असे सीड असोसिएशनचे म्हणणे आहे. सरकारने बियाणे कंपन्यांकडून वसुलीची सक्‍ती केल्यास या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही कंपन्यांनी दिल्यानंतर कृषी सचिव विजयकुमार यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना ही माहिती दिली.   

कृषी सचिव विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्‍त कापससाठी नुकसानभरपाईचा वेगळा कायदा आहे. शेतकऱ्याने ‘जी’ फाॅर्म भरून द्यावा. ‘एच’ फाॅर्ममध्ये अधिकारी, विद्यापीठ तज्ज्ञ, कंपनी प्रतिनिधी तपासणी करून निरीक्षण नोंदवितात आणि त्यानंतर ‘आय’ फॉर्ममध्ये नुकसानभरपाईचे आदेश देण्याची तरतूद आहे. जालना येथील एका कंपनीला यापूर्वीच्या एका प्रकरणात ३६ लाख रुपये भरपाईचे आदेश दिले आहेत.

कंपनीने शेतकऱ्याला ही रक्‍कम देण्यास नकार दिला. त्यामुळे ही रक्‍कम न्यायालयात भरण्याचे आदेश दिले. याच पद्धतीचा अवलंब कंपन्यांकडून वसुलीसाठी अंगीकारला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न राहतील. कंपन्यांनी तंत्रज्ञान पुरवठादाराशी तंत्रज्ञानासंदर्भात भांडावे. त्याच्याशी सामान्य शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्‍नही विजयकुमार यांनी उपस्थित केला.

इतर अॅग्रो विशेष
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...