agriculture news in Marathi, companies hearing finished in drip fraud case, Maharashtra | Agrowon

ठिबक घोटाळ्यातील कंपन्यांची सुनावणी पूर्ण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे : राष्ट्रीय सिंचन अभियानात झालेल्या घोटाळा प्रकरणी ठिबक कंपन्यांची सुनावणी प्रक्रिया कृषी आयुक्तालयात पार पाडली आहे. 

ठिबक घोटाळ्याबाबत या दोन समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. समितीच्या अहवालात या गैरव्यवहाराला जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. ‘‘या घोटाळ्याला आम्ही जबाबदार नाही. गुन्हा दाखल करण्यापूर्वी आमचे म्हणणे घ्यावे. त्यासाठी सुनावणी घ्यावी,’’ अशी मागणी कंपन्यांची होती. 

पुणे : राष्ट्रीय सिंचन अभियानात झालेल्या घोटाळा प्रकरणी ठिबक कंपन्यांची सुनावणी प्रक्रिया कृषी आयुक्तालयात पार पाडली आहे. 

ठिबक घोटाळ्याबाबत या दोन समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. समितीच्या अहवालात या गैरव्यवहाराला जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. ‘‘या घोटाळ्याला आम्ही जबाबदार नाही. गुन्हा दाखल करण्यापूर्वी आमचे म्हणणे घ्यावे. त्यासाठी सुनावणी घ्यावी,’’ अशी मागणी कंपन्यांची होती. 

कंपन्यांच्या मागणीनुसार राज्याचे फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांनी सुनावणीची प्रक्रिया मंगळवारी पार पाडली. ठिबक घोटाळ्यात आम्ही १८ कंपन्यांवर ठपका ठेवला आहे. सुनावणीसाठी मात्र प्रत्यक्षात तीन कंपन्या आल्या. सुनावणीदरम्यान या कंपन्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. आम्हाला नेमका आमचा दोष काय आहे, हेच कळविलेले नाही. त्यामुळे त्याबाबत माहिती द्यावी. ही माहिती मिळाल्यानंतर म्हणणे मांडता येईल, अशी भूमिका कंपन्यांनी घेतली. त्यामुळे सुनावणीदरम्यान कृषी विभागाने या कंपन्यांना दोषारोपांबाबत माहिती पुरवली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

ठिबक घोटाळ्यात अडकलेल्या कंपन्यांना त्यांच्या विरोधातील मुद्दे देण्यात आलेले आहेत. या मुद्द्यांवर आता कंपन्या आपला खुलासा देतील. कंपन्यांच्या मुद्द्यांचे विश्लेषण करून फलोत्पादन संचालक श्री. पोकळे यांच्याकडून सदर प्रस्ताव पुन्हा मंत्रालयात पाठविला जाईल. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करायची की नाही याचा निर्णय तूर्त लांबला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ठिबक घोटाळ्यातील फक्त कंपन्यांनाच अडकविण्याचा डाव कृषी खात्याने रचल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. कृषी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कंपन्यांना अडकविले जात असल्याची तक्रार कंपन्यांनी राज्य शासनाकडे यापूर्वीच केली आहे.

प्रकरण मिटविण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याचा पुढाकार
ठिबक घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांची सर्व पातळ्यांवर धावपळ सुरू आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याने जोरदार व्यूहरचना केल्याची चर्चा कृषी आयुक्तालयात आहेत. या प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल होणार नाही, असे आश्वासन या अधिकाऱ्याने दिले आहे. मुळात या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असल्यामुळे पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही, असा जोरदार युक्तिवाद अधिकाऱ्याकडून होण्याची चिन्हे आहेत.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...