agriculture news in Marathi, companies not to deliver urea | Agrowon

युरिया पोच करण्यास खत कंपन्यांचा नकार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्ह्यात युरियाची पोच (वाहतूक खर्च) करण्यासाठी दोन खत कंपन्या नकार देत आहेत. परिणामी, विक्रेते (होलसेलर) हा खर्च उचलतात. मग आपले मार्जीन (नफा) कमी व्हायला नको म्हणून ग्रामीण भागात जादा दर आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपन्यांना मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ताकीद दिली, तरीही या कंपन्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जळगाव : जिल्ह्यात युरियाची पोच (वाहतूक खर्च) करण्यासाठी दोन खत कंपन्या नकार देत आहेत. परिणामी, विक्रेते (होलसेलर) हा खर्च उचलतात. मग आपले मार्जीन (नफा) कमी व्हायला नको म्हणून ग्रामीण भागात जादा दर आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपन्यांना मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ताकीद दिली, तरीही या कंपन्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

युरिया खताबाबत या दोन आघाडीच्या कंपन्या रेल्वे मालधक्‍क्‍यापासून ते विक्रेत्यापर्यंत हे खत पोचविण्यासाठी वाहतूक भाडे विक्रेत्यांना खर्च करायला लावतात. हा वाहतूक खर्च कंपन्यांना किलोमीटरच्या निकषानुसार अनुदान म्हणून मिळतो, परंतु हा खर्च मिळायला वरिष्ठ पातळीवरून (खते विभाग) मिळायला विलंब होतो. त्यासाठी बिले व इतर सर्व किचकट प्रक्रिया पार पाडायच्या असतात, म्हणून या कंपन्या विक्रेत्यांनाच सुरवातीला हा खर्च करायच्या सूचना देतात. चाळीसगाव, अमळनेर, जामनेर, रावेर, बोदवड, मुक्ताईनगरपर्यंत युरियाची एक गोणी जळगावच्या मालधक्‍क्‍यावरून नेण्यासाठी जवळपास १५ रुपये भाडे विक्रेत्यांना द्यावे लागते. मग हे भाडे विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा दर आकारून वसूल करतात. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. हा प्रकार कृषी विभागाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना पत्र देऊन विचारणा केली, परंतु अजूनही संबंधित कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेली नाही. 

विक्रेत्यांना युरियाच्या एक गोणीमागे आठ ते १० रुपये नफा मिळतो. त्यावर संबंधित खत कंपन्या आणखी इतर विद्राव्य, सूक्ष्मअन्नद्रव्ये विक्रीचे टार्गेट खते विक्रेत्यांना देतात. ते विकले तर नफा अधिक, असा फंडा या कंपन्यांनी सुरू केला आहे. मग खत विक्रेते युरिया विक्री करताना संबंधित विद्राव्य व सूक्ष्मअन्नद्रव्ये (खते) शेतकऱ्यांना देतात. या प्रकाराला कृषी विभागाने लिकींग म्हणून बंदी केलेली असली तरी हा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे, असे सांगण्यात आले. 

दोन खत कंपन्या खतांचा वाहतूक खर्च त्यांना अनुदान म्हणून मिळूनही 
आपले होलसेलर, विक्रेत्यांना हा खर्च करायला लावतात. त्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी पत्र देणार आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...