agriculture news in marathi, compensation decleared for bollworm, marathwada | Agrowon

मराठवाड्याला बोंडअळी नुकसानीपोटी १२२१ कोटींचा निधी मंजूर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018
परभणी : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकयांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे.
 
परभणी : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकयांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे.
 
२०१७ मधील हंगामात मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतील बीटी कपाशीचे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.
 
त्यानुसार आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये एवढा निधी तीन समान हप्त्यामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (एनडीआरएफ) निकषानुसार जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६८०० रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १३,५०० रुपये देण्यात येणार आहेत. २ हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत किमान १ हजार रुपये तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रकारानुसार जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे.
 
मदतीची रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर थेट हस्तांतर पद्धतीने (डीबीटी) जमा करण्यात यावी. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड नसेल तर अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राच्या आधारे खातरजमा करून मदत देण्यात यावी. मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये. जिल्ह्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर मदतीची रक्कम वाटप केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. त्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील मागणी शासनाकडे करण्यात यावी. त्यानंतरच संबंधीत जिल्ह्यांना पुढील हप्ताची रक्कम वितरित करण्यात यावी.
 
शासनाकडून मदतीची रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार असली तरी शेतकऱ्यांना मात्र मदतीचे वाटप करताना अनुज्ञेय असलेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी अदा करावी, असे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आलेले आहेत.
 
 
 
जिल्हानिहाय बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम (कोटी रुपये)
जिल्हा रक्कम 
औरंगाबाद २९६.२५०९
जालना २७५.३७६९
परभणी १५७.९७९२
हिंगोली ३६.६०४२
नांदेड १७६.१२६४
लातूर ८.६००९
उस्मानाबाद १३.५१३०
बीड २५६.५८९३

 

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...