बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला १५७ कोटींचे अनुदान

बोंडअळी
बोंडअळी

नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना १५७ कोटी २३ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. जिल्हाभरातील एक लाख ९७ हजार ३४२ शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. पहिल्या हप्त्यात ५१ कोटी ८८ लाख रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये यंदा १ लाख ४२ हजार ७३५ हेक्‍टर क्षेत्र यामुळे बाधीत झाले होते.

जिल्ह्याच्या दक्षिण भागासह आता बहुतांश भागात कापसाची लागवड केली जाते. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सत्तर हजार हेक्‍टरने क्षेत्र वाढले आहे. यंदा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. राज्यभरातील नुकसानीचा विचार करता शासनाने मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. प्रशासनाने गाव पातळीवर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले.

कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये १ लाख ४९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली असल्याचे सांगत १ लाख ४२ हजार ७३५ हेक्‍टरला बोंड आळीमुळे फटका बसला असल्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यासाठी १५७ कोटी २३ लाख १४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

जिल्हाभरातील १ लाख ९७ हजार ३४२ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. पहिल्या हप्त्यात ५१ कोटी ८८ लाख ६३ हजाराचे वाटप केले जाणार असून ३३ कोटी ४९ लाख रुपये वितरित केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com