agriculture news in marathi, compensation decleared for farmers, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018
पुणे : गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापूस पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट आली होती. या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेल्या भरपाईचा लाभ पुणे जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 
 
पुणे : गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापूस पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट आली होती. या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेल्या भरपाईचा लाभ पुणे जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 
 
पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील बारामती, दौंड, शिरूर आणि खेड तालुक्‍यांत काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. खरीप हंगामात जवळपास १३४ शेतकऱ्यांनी ८६.८९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली होती. जिल्ह्यातील बारामती, दौंड, शिरूर व खेड तालुक्‍यातील कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे येथील शेतकऱ्यांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.
 
नुकसान झालेले कपाशीचे क्षेत्र बागायती भागातील असल्याने त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे प्रतिहेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये मिळणे अपेक्षित आहे. एकूण झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२ लाख ५ हजार ४१५ रुपये एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे. 
 
दौंड तालुक्‍यातील ६५ शेतकऱ्यांनी ३९.१४ हेक्‍टरवर कपाशीची पेरणी केली होती. त्यांना एकूण पाच लाख ६० हजार ७९० रुपये मिळणे अपेक्षित आहे. शिरूर तालुक्‍यातील ३५ शेतकऱ्यांनी २८.४६ हेक्‍टरवर पेरणी केली होती. त्यांना तीन लाख ८४ हजार २१० रुपये, तर बारामती तालुक्‍यातील ३३ शेतकऱ्यांना १८.०९ हेक्‍टरसाठी दोन लाख ४४ लाख २१५ रुपये आणि खेड तालुक्‍यातील एक शेतकऱ्यांला १.२० हेक्‍टरसाठी १६ हजार २०० रुपये मिळणे अपेक्षित आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...