agriculture news in marathi, compensation decleared for hailstrom affected crops, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील गारपीटग्रस्तांसाठी १३० कोटी ७१ लाखांचा निधी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १३० कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, तो निधी विभागस्तरावरून जिल्हास्तरावर वितरणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
 
औरंगाबाद  : मराठवाड्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १३० कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, तो निधी विभागस्तरावरून जिल्हास्तरावर वितरणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
 
मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. हे संकट संपत नाही तोच ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. प्राथमिक अंदाजानुसार १ लाख ९६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. संयुक्‍त पंचनाम्याअंती १ लाख ४७ हजार २०६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
 
औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांतील नुकसानीचा अहवाल विभागस्तरावरून शासनाला सादर करण्यात आला होता. त्यामध्ये ३३ टक्‍के ते ५० टक्‍के नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये जिरायती, बागायती व फळपिकं मिळून ७८ हजार ६२६.३९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगून या नुकसानभरपाईपोटी ६७ कोटी ४४ लाख २७ हजारांची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
 
दुसरीकडे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ६८ हजार ५८१ हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ६३ कोटी २७ लाख ४७ हजार रुपयांची नुकसानभरपाईसाठी आवश्‍यकता असेल असे स्पष्ट करण्यात आले होते. 
 
मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सात जिल्ह्यांतील ४ लाख ५२ हजार ८११ शेतकऱ्यांच्या पिकांचे गारपिटीत नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान नुकसान झालेल्या २ लाख ९४ हजार ५३३ व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या १ लाख ५८ हजार २७८ शेतकऱ्यांचा समावेश होता. शासनाने मदत जाहीर केल्यानुसार मराठवाड्यासाठीचा निधी उपलब्ध झाला आहे.
 
यात सर्वाधिक ५८  कोटी ३२ लाख ५१ हजार रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आले आहेत. हिंगोलीसाठी ४ कोटी ६७ लाख ४१ हजार, जालना जिल्ह्यासाठी २४ कोटी ८२ लाख ५० हजार, नांदेड जिल्ह्यासाठी १८ कोटी ६८ लाख १४ हजार, बीड जिल्ह्यासाठी ४ कोटी ७ लाख १८ हजार, लातूर जिल्ह्यासाठी १६ कोटी ४३  लाख ९३ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ३ कोटी ७० लाख ९ हजार रुपये असा १३० कोटी ७१ लाख ७८ हजार रुपयांचा हा निधी आहे. प्राप्त झालेल्या निधी पंचनाम्यानुसार वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
आपदग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत ही रक्‍कम करण्यात आलेल्या संयुक्‍त पंचनाम्याच्या आधारे देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मिळणारी मदत ही थेट आपदग्रस्तांच्या बॅंक खात्यावर जमा करावयाची असून, यामधून कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये; तसेच रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत न देण्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...