agriculture news in marathi, compensation distribute to farmers, parbhani,maharashtra | Agrowon

परभणीत बोंडअळी नुकसानीपोटी ४२ कोटीं वितरित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018
परभणी  ः गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार अनुदानापैकी ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी नऊ तालुक्यांना वितरित केला आहे.
 
संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. अनुदानासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय याद्या परभणी जिल्हा संकतेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 
परभणी  ः गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार अनुदानापैकी ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी नऊ तालुक्यांना वितरित केला आहे.
 
संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. अनुदानासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय याद्या परभणी जिल्हा संकतेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 
२०१७ मध्ये लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील कपाशीचे संपूर्ण क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याचे कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते.
 
परंतु त्यानंतर कृषी सहायक आणि तलाठी यांच्या पथकाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केल्यानंतर ३ लाख ५१ हजार ११८ शेतकऱ्यांच्या जिरायती क्षेत्रावरील २ लाख ३३ हजार २४ हेक्टरवरील कपाशीचे बोंड अळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले होते. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यानुसार १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.
 
हा निधी जिल्ह्याला तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. त्यानुसार मंजुरी निधीपैकी पहिल्या हप्त्यातील ५२ कोटी ६६ लाख रुपये एवढा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपये निधी नऊ तालुक्यांना बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आहे.
 
राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (एनडीआरएफ)च्या निकषानुसार जिरायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. बोंड अळीमुळे बाधित अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय याद्या परभणी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आल्या आहेत, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...