agriculture news in marathi, compensation pending of tur procurement , beed, maharashtra | Agrowon

बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे चुकारे थकीत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असून, गेल्या हंगामात पेरलेल्या आणि अलीकडे विकलेल्या तुरीचे चुकारे यंदाच्या हंगामातील तूर पेरणीसाठी तरी मिळतील की नाही अशी शंका आहे. जिल्ह्यात सव्वादोन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, खरेदी बंद झाल्याने ४० हजार क्विंटल तूर अद्यापही केंद्रांवर खरेदीविना पडून आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून खरेदी झालेल्या एक लाख क्विंटल तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाही.

बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असून, गेल्या हंगामात पेरलेल्या आणि अलीकडे विकलेल्या तुरीचे चुकारे यंदाच्या हंगामातील तूर पेरणीसाठी तरी मिळतील की नाही अशी शंका आहे. जिल्ह्यात सव्वादोन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, खरेदी बंद झाल्याने ४० हजार क्विंटल तूर अद्यापही केंद्रांवर खरेदीविना पडून आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून खरेदी झालेल्या एक लाख क्विंटल तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाही.

जिल्ह्यात शासनाने नाफेड मार्फत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने १५ केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्यात आली. मात्र, सुरवातीपासून खरेदीतल्या कच्च्या दुव्यांमुळे शेतकऱ्यांची फरफट झाली असून, तूर खरेदी संपल्यानंतरही ही फरफट सुरूच आहे.

आतापर्यंत १४ केंद्रांवर २१ हजार ५५० शेतकऱ्यांची दोन लाख २१ हजार १३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मात्र, १५ मेपासून शासनाची हमीभाव खरेदी बंद झाल्याने अद्यापही १० हजारांवर शेतकऱ्यांची ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर केंद्रांवरच पडून आहे.

दरम्यान, हमीभावाने खरेदी झालेल्या तुरीचे पंधरा दिवसांत चुकारे द्यावेत असा पणन कायदा आहे. मात्र, फेब्रुवारीत तूर विकलेल्या काही शेतकऱ्यांना तीन महिन्यांनंतरही अद्याप चुकारे मिळाले नसल्याचे समोर आले आहे. शेतकरी बिभीषण शेळके यांनी २६ फेब्रुवारीला, तर गवळीदास घोलप यांनी २३ मार्चला तूर विकली आहे. अशा साधारण २५ हजार शेतकऱ्यांनी विकलेल्या एक लाख क्विंटल तुरीचे अद्याप चुकारे मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, तूर खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या तुरीचे माप उशिरा होण्यापासून ते चुकारे मिळण्यास उशीर होण्यास वखार महामंडळ आणि ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेचा गोंधळ कारणीभूत आहे. मापे झालेल्या तुरीला साठवणुकीसाठी गोदाम वेळेत उपलब्ध करून न देणे आणि दिल्यानंतर त्याच्या नोंदी तत्काळ न दिल्याने चुकारे मिळण्यास विलंब होण्यास कारणीभूत आहे. 

फेब्रुवारीत माप झालेल्या शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदी मे महिन्यात झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे यातही मोठे गौडबंगाल आहे. बिभीषण शेळके यांच्या तुरीचे फेब्रुवारीत तर गवळीदास घोलप यांच्या तुरीचे मार्च महिन्यात माप झाले असले तरी ऑनलाइनमध्ये मे महिन्यात माप झाल्याची नोंद आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...