बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी पैसे मागितल्याची तक्रार

बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी पैसे मागितल्याची तक्रार
बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी पैसे मागितल्याची तक्रार

अकोला : बोंड अळीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्यांनी क्षेत्र वाढवून देतो, असे सांगत पैसे मागितले असल्याचा आरोप करणारे निवेदन तळेगाव बुद्रुक येथील शेतकऱ्याने मंगळवारी (ता.१९) तहसीलदारांकडे दिले. तर याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी उपरोक्त शेतकरी पितापुत्राविरुद्ध पोलिसांत तक्रार देत जिवे मारण्याची धमकी दिली, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे म्हटले आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बुद्रुक येथे हा प्रकार जिल्हाभर गाजत आहे.

यासंदर्भात तळेगाव येथील शेतकरी पुंडलीक लक्ष्मण तांबडे, राहुल पुंडलीक तांबडे यांनी तेल्हारा तहसीलदारांना निवेदन दिले. त्यात म्हटले की, बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी तलाठी श्री. गिरी व कृषी सहायक मनोज सारभुकन हे रविवारी (ता.१७) शेतात आले. त्यांनी कपाशीची पाहणी केली. त्याचे फोटोसुद्धा घेतले. काही शेतामध्ये हरभरा पेरलेला असून ते क्षेत्र बोंड अळीचे दाखविण्यासाठी त्यांनी चार हजार रुपये मागितले. या वेळी शेतात काम करणारे मजूर, मिलिंद बोदडे हेसुद्धा तेथे उपस्थित होते. ही माहिती आपण वडील पुंडलीक तांबडे यांना सांगितली.

वडिलांनी याचा जाब कर्मचाऱ्यांना विचारला. पैशाची मागणी कशी करता हे विचारले असता क्षेत्रफळ दाखवणे आपल्या हातात आहे. तुम्ही पैसे दिले नाही तर तुमचे कपाशीचे क्षेत्रफळ कमी करून नुकसानीची टक्केवारी कमी दाखवेन असे म्हटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनीच पोलिसात आमच्याविरुद्ध तक्रार दिली. आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचे मंगळवारी (ता.१९) कळाले. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी तांबडे पितापुत्राने तहसीलदारांकडे केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com