agriculture news in marathi, Complaint against 17 people in Chikhli for Urad scam | Agrowon

उडीद खरेदी घोटाळ्याप्रकरणी चिखलीत १७ जणांविरुद्ध तक्रार
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

बुलडाणा  : नाफेडच्या बुलडाणा आणि चिखली येथील खरेदी केंद्रावर उडीद खरेदीत मोठा घोळ झाल्याचे समोर अाले असून, तिघांविरुद्ध बुलडाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. तर दुसरीकडे याच प्रकरणी शनिवारी (ता.१०) चिखलीमध्येही १७ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात अाली अाहे.  

बुलडाणा  : नाफेडच्या बुलडाणा आणि चिखली येथील खरेदी केंद्रावर उडीद खरेदीत मोठा घोळ झाल्याचे समोर अाले असून, तिघांविरुद्ध बुलडाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. तर दुसरीकडे याच प्रकरणी शनिवारी (ता.१०) चिखलीमध्येही १७ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात अाली अाहे.  

बुलडाणा व चिखली केंद्रावरील उडीद खरेदीत घोळ झाल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती नेमलेली असून, या समितीने ३२ जणांना नोटिसासुद्धा बजावल्या अाहेत. त्यांच्याकडून माहिती गोळा केली जात अाहे. एकाच सातबारावर बुलडाणा व चिखली येथील हमीभाव खरेदी केंद्रावर उडीद विकण्यात अाला अाहे. काही व्यापाऱ्यांनी यामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणात फसविले अाहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य पाहता दाखल झालेल्या तक्रारींवरून जिल्हा उपनिबंधकांनी फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच चौकशी करण्याच्या प्रक्रियेला वेग अाणला अाहे.

जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी स्वतः चिखली येथे चौकशी केली. बुलडाण्यातही चौकशी केली जात अाहे. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय अाहे, त्यांची सखोल माहिती गोळा केली जात अाहे. शेतकरी, व्यापारी, अडते यांच्याकडून माहिती घेणे सुरू अाहे. चिखली तसेच बुलडाणा येथील केंद्रावर अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यापाऱ्यांनी बोगस शेतकरी दाखवत उडीद विकल्याचा अारोप अाहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सीड प्लॉट घेतला होता त्यांच्याच सातबाऱ्यावर उडीद विकण्यात अाला. म्हणजेच उडीद न पेरताही विकल्या गेला. अशा सोयाबीनचे प्लॉट घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती ‘महाबीज’कडून प्रशासनाने प्राप्त केली अाहे.

या प्रकरणाचे गांभीर्य मोठे असून जिल्हा उपनिबंधक श्री. चव्हाण, सहायक निबंधक अविनाश सांगळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव यांची त्रिस्तरीय समिती चौकशी करीत अाहे. लवकरच मोठ्या प्रमाणात घोळ समोर येण्याची चिन्हे अाहेत. शनिवारी श्री. शिंगणे यांनी चिखली पोलिसांत १७ परवानाधारक अडते, व्यापाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली अाहे. उडीद घोळ प्रकरणात बुलडाण्यापाठोपाठ चिखलीतही पोलिसात फिर्याद दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली अाहे.

यांच्याविरुद्ध दाखल झाली फिर्याद
अाधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने चिखली येथील खरेदी केंद्रावर उडीद खरेदीत गैरव्यवहाराबाबत अालेल्या तक्रारीवरुन जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईचे अादेश दिले होते. यामध्ये चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक १७ खरेदीदार, ट्रेडर्स, अडत्यांविरुद्ध तक्रार देण्यात अाली.  जिल्हा मार्केटींग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी याबाबत फिर्याद दिली. यामध्ये नितीन शेळके, शिवाजी देशमुख, ज्ञानेश्वर इंगळे, अनंता सोनुने, मधुकर ठेंग, भानुदास ढाकेफळे, शिवदास सुरडकर, वंदना रामेश्वर वाघ, भास्कर खरपास, संतोष काळे, शोभादेवी वाधवाणी, मनिष अग्रवाल, वसंत महाजन, बालाजी ठेंग, रामदास लेंभे, रामेश्वर वाघ, नरेंद्र लढ्ढा  यांचा समावेश अाहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...