agriculture news in marathi, Complaint against Nashik APMC director to be launched | Agrowon

नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे दाखल होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर केल्याप्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, सचिव काळे यांच्यासह तीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिकच्या तहसीलदारांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आचारसंहितेच्या काळात बाजार समितीच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर केल्याप्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, सचिव काळे यांच्यासह तीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिकच्या तहसीलदारांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आचारसंहितेच्या काळात बाजार समितीच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची सध्या अचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या काळातच बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी समितीच्या एमएच १५ ईएक्स ३७९५ या वाहनातून पिंपळगावपर्यंत प्रवास केला. या वेळी बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे, दिलीप थेटे, रवींद्र भोये आदी होते. वाहन वापरताना या सर्वांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती.

पिंपळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या विविध विकासकामांना भेटी दिल्या होत्या. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी केली. यामध्ये बाजार समितीचे सचिव आणि वाहनचालकाचे जाबजबाब प्रशासनाने नोंदवून घेतले. तसेच संबंधित संचालकांकडून खुलासा मागविला होता.  

संबंधित संचालकांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचा खुलासा सादर केला. त्यात निवडणूक आयोगाचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा दावा केला आहे. तसेच वाहन हे सचिवांच्या अधिपत्याखाली असून, त्याबाबतचे लॉगबुकही त्यांच्याकडेच असल्याचे नमूद केले आहे. तसेच चालकाने सचिवांच्या परवानगीशिवाय वाहनाचा उपयोग केल्याचेही खुलाशात नमूद केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपसभापती तुंगार, संचालक युवराज कोठुळे, दिलीप थेटे, रवींद्र भोये यांच्यासह समितीचे सचिव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...