agriculture news in Marathi, complaint before four year to agri department, Maharashtra | Agrowon

बोगस कृषी विद्यापीठ : कृषी विभागाकडे चार वर्षांपूर्वीच तक्रार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बोगस कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत मागासवर्ग खुले कृषी विद्यालय या नावाखाली राज्यभरात जवळपास ४२ कृषी विद्यालये सुरू झाली. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चार वर्षांपूर्वीच या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा दोन ठिकाणी पोलिसांत फिर्यादी दाखल झाल्या. पण कारवाईच्या अनुषंगाने दोन्हीही पातळ्यांवर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बोगस कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत मागासवर्ग खुले कृषी विद्यालय या नावाखाली राज्यभरात जवळपास ४२ कृषी विद्यालये सुरू झाली. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चार वर्षांपूर्वीच या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा दोन ठिकाणी पोलिसांत फिर्यादी दाखल झाल्या. पण कारवाईच्या अनुषंगाने दोन्हीही पातळ्यांवर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. 

अण्णा इसुरेनामक व्यक्ती ही या विद्यापीठाचे संस्थापक असल्याचे सांगितले जाते. राज्यातील काही जिल्ह्यांत तिथल्या लोकांना हाताशी धरून त्याने पद्धतशीरपणे संपर्क ठेवून या विद्यालयाच्या शाखा वाढवल्या. सोलापूर जिल्ह्यातील अनेक ‘दादा’, ‘मामा’, ‘आबा’ यांसारख्या राजकीय नेत्यांच्या हस्ते त्याने या कृषी विद्यालयाची दिमाखात उद्घाटने केली. त्यामुळे साहिजकच विद्यार्थी आणि पालकांचा त्यावर अधिक विश्‍वास बसला. पण या कृषी विद्यालयाच्या मान्यतेबाबत कोणीच चौकशी किंवा खोलात गेले नाही. 

या कृषी विद्यालयाच्या लेटरहेडवर भारत सरकारच्या अधिकृत अशोकस्तंभ या राजमुद्रेच्या चिन्हाचाही वापर केलेला होता. त्यामुळे संशयाचा विषयच राहिला नाही; पण बोगस कृषी विद्यापीठ ज्या भागात स्थापले गेले. त्या अक्कलकोट तालुक्‍यातील कृषी विभागात कार्यरत असणारे पर्यवेक्षक नरेंद्र कल्याणशेट्टी यांना ज्या वेळी तडवळ, कोन्हाळी या भागातील या कृषी विद्यालयासंबंधी संशय आला. तेव्हा चार वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच या संबंधी कृषी विभागाकडे तक्रार केली. पण आजतागायत त्यांना उत्तर मिळालेले नाही.

गेल्या चार वर्षांत अनेक विद्यार्थी आणि पालकांची यामध्ये मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले. सोलापुरात संभाजी मस्के आणि पाचोऱ्यात संजय पाटील यांनी इसुरे याच्यावर २०१५ मध्ये गुन्हे दाखल केले. पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. शिवाय विद्यार्थी आणि पालकांपैकीही अद्याप कोणीच पुढे आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण आणि त्याचा तपास जैसे थेच आहे.

विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाची सहल 
या कृषी विद्यापाठाशी संबंधित कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचा भाग म्हणून राज्यातील अनेक भागांत कृषी सहली घडवून आणण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील एका कृषी विद्यापीठाचीही सहल या विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात आली. पण तरीही ‘त्या’ कृषी विद्यापीठाला या कृषी विद्यालयाचा संशय येऊ नये, याबाबतही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...