agriculture news in marathi, Complaints about the issue of insurance returns | Agrowon

विमा परताव्याच्या प्रश्नांवर तक्रारींचा पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 जुलै 2018

औरंगाबाद : लातुरातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या लाभधारकांचं कोडं सुटलं तरी विमा परतावा मिळाला नाही, मिळाला तर संरक्षित रकमेच्या तुलनेत कमी मिळाला, काहींना मिळाला काहींना नाही. यांसह अनेक तक्रारींचा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात होत असून, जालन्यात तर जिल्हाधिकारी कार्यालयात उघडलेल्या कक्षात विम्याविषयीच्या कैफियती मांडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

औरंगाबाद : लातुरातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या लाभधारकांचं कोडं सुटलं तरी विमा परतावा मिळाला नाही, मिळाला तर संरक्षित रकमेच्या तुलनेत कमी मिळाला, काहींना मिळाला काहींना नाही. यांसह अनेक तक्रारींचा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात होत असून, जालन्यात तर जिल्हाधिकारी कार्यालयात उघडलेल्या कक्षात विम्याविषयीच्या कैफियती मांडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

विमा भरल्याची पावती आहे. मंडळात त्या पिकाचा विमा मंजूर आहे. काहींना विमा परतावा मिळाला तर काहींना मिळत नाही, असं का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तर विमा परतव्याविषयी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्या कक्षात संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधीही आहेत. या कक्षात आपली गाऱ्हाने मांडण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत. ही बाब विमा परतवा शेतकऱ्यांना अजूनही मिळत नसल्याचे अधोरेखित करणारी ठरली आहे. सर्व पुरावे, विमावाले लोक व प्रशासन असताना लगेचच प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.

बॅंकेत कुटुंबातील सहा खात्यांत विम्याचा हप्ता एकाच वेळी भरला. पाच खात्यांवर कंपनीने संरक्षित रकमेच्या तुलनेत परतावा कमी मंजूर केला. तर एका खात्यावर अजून काहीच मिळालं नाही.
- ईश्वर पाटील,
तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद.

गतवर्षी विमा भरण्यासाठी तारीख वाढविल्याचा फायदा कुणालाच मिळाला नाही. गत हंगामात १ हेक्‍टर ७० आर क्षेत्राचा विमा उतरविला त्याचा परतावा अजून नाही. अनेक ऑनलान विमा भरणाऱ्यांना परतावाच नाही.
- ज्ञानोबा तिडके,
पांगरी, ता. परळी, जि. बीड.

आम्ही गत हंगामात सोयाबीन, मूग, उडदासाठी ११०४ रुपये विमा हप्ता भरला. त्याचा परतावा म्हणून मूग, उडदाचे १६२३ रुपये खात्यावर आले. सोयाबीनचा अजून रुपया नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू झाला. त्यात याविषयी माहिती दिली, तर महिन्यानं येईल म्हणतात.
- अंगद डिक्‍कर, रेवगा, ता. जि. जालना

जिल्हाधिकारी कार्यालयातील तक्रार कक्षात भरलेलेल्या विमा रकमेचा परतावा नाही, म्हणून चौकशी केली तर माझा परतावा दुसऱ्याचा खात्यात गेल्याचं कळलं. त्यांनी पैसे कोणत्या खात्यात गेले हे टिपलंय. पाहू काय होतं ते.
- दीपक जगताप,
घोटन, ता. जि. जालना

३२० रुपये विमा हप्ता भरला. एक रुपयाही आला नाही. महिन्यापूर्वी विमा कंपनीच्या हेडऑफीसला भेटलो ते महिन्यानं येईल म्हणे. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात कळवलं तर तेथेही तेच उत्तर. पावती आहे, परतव्यासही पात्र, विमा मंजूर, कंपनीचेही लोक आहेत, मग लगेच प्रश्न का सुटत नाही कळत नाही.
- सखाराम गोल्डे,रेवगा, ता. जि. जालना

इतर अॅग्रो विशेष
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...