परभणीत `जलयुक्त शिवार’ची ८७४ कामे पूर्ण

परभणीत `जलयुक्त शिवार’ची ८७४ कामे पूर्ण
परभणीत `जलयुक्त शिवार’ची ८७४ कामे पूर्ण

परभणी ः जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या १२८ गावांमध्ये कार्यारंभ दिलेल्या विविध यंत्रणांच्या २ हजार १९१ कामांपैकी ८७४ कामे पूर्ण झाली असून ९०२ कामे अपूर्ण आहेत; परंतु ४१५ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. पावसाळा सुरू झाल्यामुळे अपूर्ण, तसेच उर्वरित कामे लांबणीवर पडणार आहेत.

राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या वर्षी २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील १२८ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता (स्थानिक स्तर), विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालय, कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग), पंचायत विभाग या यंत्रणांमार्फत करावयाच्या २ हजार ३५९ कामांचा ५३ कोटी ४ लाख ९४ रुपये खर्चाचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. आराखड्यानुसार ५१ कोटी २० लाख ९९ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या २ हजार ३४४ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २ हजार १९१ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.

कार्यारंभ दिलेल्यापैकी ८७४ कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांमध्ये कृषी विभागाची कामे सर्वाधिक ६५० आहेत. ९०२ कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामांमध्ये कृषी विभागाची ३५१ कामे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेची २७० कामे, कार्यकारी अभियंताची (स्था.स्त.) ३८, लघुपाटबंधारे विभागाची १७ कामे, पंचायत विभागाच्या २१६ कामांचा समावेश आहे. अद्याप कामे न सुरू झालेली ४१५ कामे आहेत. त्यामध्ये कृषी विभागाच्या १३०, लघुपाटबंधारे विभागाच्या ३८, सामाजिक वनीकरण विभागाच्या ४५, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या ६० कामांचा, तसेच पंचायत विभागाच्या १३७ कामांचा समावेश आहे. पूर्ण झालेल्या, तसेच सुरू असलेल्या कामांवर २ कोटी ४७ रुपये खर्च झाला आहे.

२०१८-१९ मधील निवड झालेल्या १०५ गावांमध्ये ६५८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी ३ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये खर्चाच्या ५३० कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात अाली असून, ३५७ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी २०७ कामे पूर्ण झाली आहेत. ५२ कामे अपूर्ण असून ९८ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com