agriculture news in Marathi, Complete the beneficiary registration immediately for 'Farmer's Honor Fund' | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’ नोंदणी करा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नोंदणी काम संथगतीने सुरू असल्याबद्दल असमाधान व्यक्त करत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त गतीने नावनोंदणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी दिले. कामचुकारपणा करणारे अधिकारी, कर्मचारी यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. केंद्रेकर यांनी या वेळी दिला. 

परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नोंदणी काम संथगतीने सुरू असल्याबद्दल असमाधान व्यक्त करत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त गतीने नावनोंदणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी दिले. कामचुकारपणा करणारे अधिकारी, कर्मचारी यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. केंद्रेकर यांनी या वेळी दिला. 

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी (ता. २१) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा विविध योजनांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे प्रकल्प संचालक प्रताप सवडे आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले की, बंधारे आणि धरणांच्या कामांना गती देण्यात यावी. जलसंपदा विभागातर्फे केली जाणारी जलसंधारणची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावेत. पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत. परभणी शहरातील नागरिकांना नळांद्वारे १३ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा ही बाब योग्य नाही. त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा कराव्यात, असे निर्देश श्री. केंद्रेकर यांनी दिले. वाळू लिलाव, रस्ते विकास, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेतला.

वृक्षारोपणाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच प्लॅस्टिक बंदीचा निर्णय प्रभावीपणे राबविला जाईल, याची महानगरपालिका, नगर पालिकेने दक्षता घ्यावी. ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा जमा करून विल्हेवाट लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या अडचणीही समजावून घेतल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आयुक्तांनी आढावा घेतला. संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्राची निश्चिती निवडणूक आयोगाच्या निकषानुसार करण्यात यावी. निवडणूक निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन श्री. केंद्रेकर यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...