agriculture news in marathi, Complete feeder shut dawn for agricultural electricity bill | Agrowon

कृषिपंप देयक वसुलीसाठी संपूर्ण फीडरच केले बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

वाशीम : वीज बिल वसुलीसाठी वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन परिसरात महावितरण कंपनीने रविवारी कृषीचे फीडरच संपूर्ण बंद केले. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी कंपनीच्या कार्यालयात जाऊन धडक दिली. अधिकारी व शेतकऱ्यांत चर्चा झाल्यानंतर वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली अाहे.

वाशीम : वीज बिल वसुलीसाठी वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन परिसरात महावितरण कंपनीने रविवारी कृषीचे फीडरच संपूर्ण बंद केले. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी कंपनीच्या कार्यालयात जाऊन धडक दिली. अधिकारी व शेतकऱ्यांत चर्चा झाल्यानंतर वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली अाहे.

सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू अाहे. खरिपातील पिके निघाली; पण भाव नसल्याने शेतकरी अाधीच संकटात अालेला अाहे. अनेकांनी शेतमाल विकलेला नाही, असे असताना वीज कंपनीने कृषिपंप देयक वसुलीसाठी रविवारी (ता.२९) शिरपूर येथून कृषी फीडर बंद केले. वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला. वीजपुरवठा खंडित झाल्याने रब्बीतील हरभरा, गहू, तसेच तूर, हळद, भाजीपाला या पिकांना पाणी देण्याची अडचण तयार झाली होती.

रब्बीतील पिके हातातून जातील की, काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती. त्यामुळे शिरपूर, शेलगाव इंगोले, दुधाळा, पांगरखेडा, करंजी व इतर गावांतील शेतकरी एकत्र येऊन वीज कंपनीच्या कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांनी प्रत्येकी किमान तीन हजार रुपये भरणा करावेत, असे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषीचे फीडर बंद केल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील वीज गुल झाली होती. सोमवारी तोडगा निघाल्याने या शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला; परंतु भरणा न केल्यास पुन्हा वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती कुऱ्हाड कायम अाहे.

ग्रामीण भागात असंतोष
शेतमालाला अाधीच भाव नाहीत. ज्यांना उत्पादन झाले अशा शेतकऱ्यांनी हा शेतमाल विकलासुद्धा नाही. अशा परिस्थितीत वीज कंपनीने वसुलीसाठी पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली अाहे. एेन रब्बी हंगामात लागवडीची धावपळ सुरू असताना वीजपुरवठा बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत अाहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला अाहे.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...