agriculture news in marathi, Complete the irrigation project in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहेत. मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले असून, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने आता हे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिले.

अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहेत. मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले असून, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने आता हे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिले.

नागपूर येथे अकोला जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बजोरिया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, बळिराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांच्यासह इतर उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहिरी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कृषिपंपांसाठी वीजजोडणी, स्वच्छ भारत अभियान, सिंचन प्रकल्प आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला.
 

कवठा बॅरेजसाठी ९० कोटी
जिल्ह्यातील कवठा, काटीपाटी, घुंगशी बॅरेज या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींना तातडीने मान्यता देण्यात आल्या. कवठा बॅरेजचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी ९० कोटींचा निधी दिला जाणार आहे. उमा बॅरेजला आलेल्या पाच अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.

शेततळ्यांची कामे तातडीने पूर्ण करावेत
जिल्ह्यात ३५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. खारपाण पट्ट्यासाठी शेततळे अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे या भागात प्राधान्याने शेततळ्यांची कामे पूर्ण करावीत. जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. या अभियानांतर्गत ठरवलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडक सिंचन विहीरअंतर्गत ५४३४ विहिरीपैंकी ४६१२ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित विहिरींचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही फडणवीस यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५०...पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज...
राजस्थानमध्ये सध्याचा कौल काँग्रेसच्या...जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान...
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे...हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (...
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवररायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने...
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये...भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...