agriculture news in marathi, Complete the objective of crop loan | Agrowon

पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा : डॉ. राजेंद्र भोसले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांनी खरीप पीक कर्जवाटपात समाधानकारक कामगिरी केलेली नाही, अशा बॅंकांनी रब्बी पीक कर्जवाटपात आता गतीने काम करावे. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांनी खरीप पीक कर्जवाटपात समाधानकारक कामगिरी केलेली नाही, अशा बॅंकांनी रब्बी पीक कर्जवाटपात आता गतीने काम करावे. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय बॅंकर्स समन्वय समितीची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सरव्यवस्थापक मोहन सांगवेकर, डीआरडीएचे प्रकल्प संचालक ए. जी. नवाळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, अग्रणी बॅंक व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.

या बैठकीत खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचा आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रुपयांची कर्जमाफी देण्यात आली याची माहिती दररोज जिल्हा उपनिबंधकांना सादर करायला हवी, ती माहिती राष्ट्रीयीकृत बॅंकांनी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.

मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया योजनेतील कर्जदारांना सर्व बॅंकांनी त्यांची कागदपत्रे तपासून कर्ज द्यावे. या योजनेत जिल्ह्यात ६६० प्रकरणे करायची होती, पण त्या तुलनेत फारच कमी प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. मुद्रा बॅंक योजनेत कर्जदारांना बॅंकेत खाते नसले, तरीही कर्ज देण्याच्या सूचना श्री. भोसले यांनी दिल्या.

इतर बातम्या
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
लाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस...मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...