नियोजन समितीची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा

नियोजन समितीची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा
नियोजन समितीची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा

सोलापूर : ‘‘जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या विकासकामामुळे लोकांचे जीवनमान उंचावणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने विकासकामांची अंमलबजावणी करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारी कामे सर्व यंत्रणांनी येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे,'' अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.

पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, बबन शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘सन २०१८-१९ साठी जिल्ह्याच्या विकासासाठी ३३९.७७ कोटी रुपयांचा आराखडा आखला आहे. त्यापैकी सत्तर टक्के निधी उपलब्ध करून संबंधित यंत्रणांना तो वितरीत केला आहे. संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागाकडून प्रस्तांवाना तांत्रिक मान्यता घ्याव्यात. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता घ्याव्यात. लवकरात लवकर कामांना सुरवात करावी. कामे वेळेत आणि दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. गेल्या आर्थिक वर्षात समितीचा जवळपास संपूर्ण निधी खर्च झाला. यंदाही सर्व निधी खर्च व्हावा. त्यामाध्यमातून जास्तीत जास्त विकासाची कामे व्हावीत.

स्वाईन फ्लू, डेंगी आजाराचे रुग्ण जिल्हृयात आढळून आल्यास आरोग्य यंत्रणेकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रभावी जनजागृती करावी. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांचा आढावा घेऊन आवश्‍यकतेनुसार आणखी रुगणवाहिका उपलब्ध होण्यास शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील टंचाईसदृश्‍ा परिस्थितीबाबत तत्काळ कार्यवाही केली जाईल. यासाठी महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभाग, सहकार विभाग यांना सूचना दिल्या आहेत, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

कृषी, संलग्नसेवांवर ३२ टक्के खर्च

सन २०१८-१९ मधील जिल्हा नियोजन समितीकडील ५२ टक्के निधी यंत्रणांनी मंजूर कामांवर खर्च केला. त्यामध्ये कृषी व संलग्न सेवा -३२.७५ टक्के, ग्रामविकास- २३.७८ टक्के, उद्योग व खाण १४.४१ टक्के, परिवहन ८९.९२ टक्के, सामान्य सेवा विभागाने ४०.७८ टक्के निधी खर्च केला आहे.  अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत २०१८-१९ साठी १४७ कोटी ५२ लाख निधी मंजूर असून, या निधीपैकी १०३ कोटी २६ लाख ४० हजार इतका निधी खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ७० इतकी आहे.

पालकमंत्री म्हणाले...

  •  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे   दर्जेदार व्हावीत.
  •      जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांच्या भरतीसाठी बैठक घेणार
  •      पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्‍टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे बैठक घेऊ
  •      अवैध सावकारीस आळा घालण्यासाठी आवश्‍यक कारवाई करा
  • जिल्हाधिकारी म्हणाले...

  •  नवीन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीचे सभागृह लवकरच पूर्ण करू
  •  जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक नवीन सभागृहात होईल
  •  जिल्ह्यात जलयुक्तची ८० टक्के गावांत कामे
  •  तालुका क्रीडा संकुल समितीचा प्रस्ताव आल्यास नावीन्यपूर्ण योजनेतून कामे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com