अकोल्यात मूग, उडदाची संमिश्र उत्पादकता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : हंगामात पावसाच्या अनियमिततेचा खरीप पिकांच्या उत्पादकतेला मोठा फटका बसलेला असताना कृषी यंत्रणांनी काढलेल्या उत्पादकतेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेत. मुगाची उत्पादकता हेक्टरी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ३६४ किलो, तर उडदाची सरासरी ३४८ च्या जवळपास म्हणजे ३२३ किलो काढण्यात अाली अाहे.

या वर्षात सुरवातीला लागवडीनंतर पडलेल्या खंडाचा मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांना जोरदार तडाखा बसला. यामुळे अनेकांना लागवड खर्चही निघाला नाही. शिवाय काहींनी तर मूग, उडदाची तोडणी करण्याएेवजी सरळ पीक उपटून फेकल्याच्या घटनाही समोर अाल्या होत्या; मात्र अाता कृषी यंत्रणांनी या दोन्ही पिकांची उत्पादकता काढल्यानंतर अालेली अाकडेवारी वस्तुस्थितीला धरून नसल्याची टीका होऊ लागली अाहे.

अकोला जिल्ह्याची मुगाची सरासरी उत्पादकता ३४१.२० किलो आणि उडदाची ३४८.८६ किलो एवढी अाहे. जिल्ह्यातील अकोट या तालुक्यात सर्वांत कमी उत्पादन झाले असल्याची बाब याच अहवालात दिसून येते. अकोट तालुक्यात मुगाचे सरासरी ३०५.५० किलोच्या तुलनेत १४५.७१ किलो उत्पादन झाले, तर याच तालुक्यात उडदाचे ३.०८.३० किलोच्या तुलनेत १६७.४२ किलो उत्पादकता अाली अाहे. म्हणजे अर्धीही सरासरी गाठली नाही.

तेल्हारा तालुक्यातही मूग, उडदाचे पीक कमी झाले. मूग २७१.९५ किलो (सरसार ३३९.४०), तर उडीद २२५.२० किलो (सरासरी ३७७.३०) झाले. बाळापूर तालुक्यात मूग व उडदाचे पीक सरासरीवर गेले. या तालुक्यात मूग ४०३.६ किलो (सरासरी ३८७.८०) अाणि उडीद ४१७.४२ किलो (सरासरी ३८०.९०) झाले. पातूर तालुक्यातही उत्पादकता वाढलेली अाहे. येथे मूग  ४८७.७७ किलो (सरासरी ३१९.८०) अाणि उडीद ४४२.२७ किलो (सरासरी ३१९.७०) उत्पादन अाले.

अकोल्यात मूग व उडदाची उत्पादकता सरासरीच्याही कमी अालेली अाहे. मूग हेक्टरी २५०.८ किलो (सरासरी ३३१.१०) अाणि उडीद २०९.३७ किलो (सरासरी३८३.१०) झाला. बार्शीटाकळी या तालुक्यात मूग व उडदाचे पीक चांगले अाले असल्याचे स्पष्ट झाले अाहे. या तालुक्यात मुगाची उत्पादकता हेक्टरी ४१७ किलो असून, त्या तुलनेत ६१२ किलो उत्पादन अाले.

उडदाचीही उत्पादकता ३९८ किलो असून, त्यातुलनेत ४५७.५८ किलो झाले. मूर्तिजापूर तालुक्यात असेच सरासरीपेक्षा अधिक पीक झाले. मूग २८७.२० च्या तुलनेत ४८६.३३ किलो आणि उडीद २७४.५० च्या तुलनेत ५६२.८३ किलो झाले अाहे. कृषी विभागाने नेमकी ही उत्पादकता कशी काढली असे यानिमित्ताने विचारले जाऊ लागले अाहे.

वास्तविक जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा, अकोट या तालुक्यांमध्ये दोन पावसांत मोठा खंड पडल्याने मूग, उडदाचे पीक धोक्यात अाले होते. अाता मात्र उत्पादकता अव्वाच्या सव्वा निघाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com