agriculture news in marathi, Composite response to 'Bandh' in Khandesh | Agrowon

खानदेशात ‘बंद‘ला संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

जळगाव : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या दोन्ही काँग्रेस आणि मनसेच्या बंदला खानदेशात सोमवारी (ता.१०) संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदुरबार, शिरपूर, नवापूर व धुळ्यात कडकडीत बंद होता; तर जळगाव जिल्ह्यात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जळगावात कार्यकर्त्यांनी हातात दांडे, काठ्या घेऊन दुकानांवर चाल करून बंदची सक्ती केली. यामुळे दहशतीचे वातावरणही होते.

जळगाव : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या दोन्ही काँग्रेस आणि मनसेच्या बंदला खानदेशात सोमवारी (ता.१०) संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदुरबार, शिरपूर, नवापूर व धुळ्यात कडकडीत बंद होता; तर जळगाव जिल्ह्यात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जळगावात कार्यकर्त्यांनी हातात दांडे, काठ्या घेऊन दुकानांवर चाल करून बंदची सक्ती केली. यामुळे दहशतीचे वातावरणही होते.

शहादा येथे बाजार समितीमधील अडतदार व इतर व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचे जाहीर केले. शहादा येथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तळोदा येथेही व्यापारी आस्थापने व इतर भागात व्यवहार सुरळीत झाले. खानदेशात एसटी बससेवा सुरू होती. या बंदचा कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.
नंदुरबार शहरात सकाळीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत बंदचे आवाहन केले.

धुळ्यातही दोन्ही कॉंग्रेस व मनसेने बंदचे आवाहन केले. त्यास व्यापारी, पेट्रोल पंप चालकांनी प्रतिसाद दिला. मुख्य मार्गांवरील पेट्रोल पंप मात्र सुरू होते. जीवनावश्‍यक सेवांवर परिणाम झाला नाही. जळगाव शहरात सकाळी ११ च्या सुमारास दोन्ही कॉंग्रेस व मनसेच्या नेत्यांनी बाजारपेठेत जाऊन बंदचे आवाहन केले. वल्लभदास वालजी व्यापारी संकुलात पळापळ झाली. महात्मा फुले मार्केटमध्येही गोंधळ झाला. काही कापड इतर वस्तू विक्रेते, व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले. पण कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायची सक्ती केली. काही कार्यकर्त्यांनी हातात दांडे, काठ्या घेऊन दुकानांवर चाल करीत जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. काही दुकानदारांनी दुपारपर्यंत बंद पाळला. नंतर आपला व्यवसाय सुरू केला.

बाजार समित्यांतील लिलाव सुरळीत

खानदेशातील सर्व बाजार समित्यांमधील मार्केट यार्डात फळे व भाजीपाला लिलाव सकाळीच झाले. शेतमाल किंवा केळीच्या वाहतुकीवरही बंदचा कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती मिळाली.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...