agriculture news in marathi, Composite response to employees' strike in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जळगाव : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात; तसेच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात सलग दोन दिवस संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेऊन निदर्शने केली. खासगी शाळा मात्र १०० टक्के बंद असल्याचे चित्र होते. विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून संपात भाग घेतला.  

जळगाव : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात; तसेच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात सलग दोन दिवस संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेऊन निदर्शने केली. खासगी शाळा मात्र १०० टक्के बंद असल्याचे चित्र होते. विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून संपात भाग घेतला.  

 जिल्हा परिषदेतील लिपिक व परिचर (वर्ग तीन) आदी कर्मचारी सहभागी झाल्याने ृपरिषदेचे कामकाज ठप्प होते. अधिकाऱ्यांनी मात्र कार्यालयात उपस्थिती लावली. काही कर्मचाऱ्यांनी संपाला नुसताच पाठिंबा दर्शवत कामकाज सुरू ठेवले होते. कास्ट्राईब युनियन व कर्मचारी महासंघ या संघटनांनी संपात सहभाग घेतला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतर्फे असलेल्या ११ हजार १५२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १ हजार १०७ कर्मचारी संपात भाग घेतला. याबरोबरच ४३१ कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर होते. म्हणजेच ९ हजार ६१४ कर्मचारी संपात नसल्याने जिल्हा परिषदेत ६० टक्के कामकाज सुरू होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील केवळ ३५ शिक्षकांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे शाळाही सुरू होत्या.

बुधवारी (ता.८) परिचर, ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलन केले. मुख्यालयातील जवळपास १५० वर्ग तीनचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. डेटा एंट्रीची कामे बंद होती. ७५० ग्रामसेवकही कामावर हजर नव्हते. महसूल विभागातील वर्ग तीन कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले. तहसीलदार कार्यालयात दाखले वाटप सुरू होते. पण महसूल टिपण, नोंदणी याची कामे बंद होती. यातच प्रशासनाने जे कर्मचारी काम करणार नाहीत, गैरहजर राहतील, त्यांचे वेतन कापले जाईल, असे आदेश जारी केले.

शाळंना तीन दिवस सुटी
खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संपात खासगी प्राथमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाल्याने संप शंभर टक्के यशस्वी ठरला. जिल्ह्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा तीन दिवस बंद राहणार आहेत. खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व प्रशासन अधिकारी डी. टी. ठाकूर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

संघटनांतर्फे निदर्शने
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद अल्पसंख्याक कर्मचारी अधिकारी संघटना, राज्य शासकीय व जिल्हा परिषद वाहनचालक कर्मचारी संघटना, राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आदींनी एक दिवसाच्या संपात सहभाग नोंदविला. या वेळी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांना निवेदन देण्यात आले.

इतर बातम्या
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
विहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...