agriculture news in marathi, computer operators on waiting for their Honorarium | Agrowon

राज्यातील संगणक परिचालक मानधनाच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई : आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल तसेच पेपरलेस करण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मागील ६ महिने ते १ वर्षापासून मानधन मिळत नाही. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर संघटनेने बहिष्कार टाकला असल्याचे राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले आहे.

मुंबई : आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल तसेच पेपरलेस करण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मागील ६ महिने ते १ वर्षापासून मानधन मिळत नाही. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर संघटनेने बहिष्कार टाकला असल्याचे राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठीचा निधी १४ व्या वित्त आयोगातून देण्यास राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा विरोध असल्यामुळे संगणक परिचालकांचे मानधन राज्याच्या अर्थसंकल्पातून करावे, यासाठी ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चा काढण्याचे नियोजन संघटनेकडून करण्यात आले होते. तत्पूर्वी ४ मार्च रोजी रात्री ११ वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा याच्यासह संघटनेच्या १२ प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. तेव्हा ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की, १ मेपासून ज्या ग्रामपंचायती निधी देणार नाहीत तेथील संगणक परिचालकांचे संपूर्ण मानधन वेगळी योजना तयार करून ग्रामविकास विभाग देईल त्यावर अद्यापही कोणतीच हालचाल झालेली नाही.

राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीचे हस्तलिखित कामकाज बंद करून सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी ग्रामविकास विभागाने १ एप्रिल २०१८ ही तारीख निश्चित केली असताना १ मे होऊनही राज्यातील एकही ग्रामपंचायत पेपरलेस होऊ शकलेली नाही. या ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी सीएससी-एसपीव्हीकडून ई-ग्राम सॉफ्ट हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. गेल्या १७ महिन्यांपासून तयार केलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे पेपरलेस ग्रामपंचायती करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

कंपनीने आपले सरकार प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा निधी घेतला पण चांगली सेवा देण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे सॉफ्टवेअर देऊन शासनाची फसवणूक केली. त्यातच स्टेशनरी न देता ग्रामपंचायतीकडून निधी घेतला आहे, 

विनाकारण संगणक परिचालकांचे मानधन कपात केले जात आहे, असा आरोपही श्री. मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर संघटनेने बहिष्कार टाकला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सीएससी-एसपीव्ही या कंपनीने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केला आहे, त्याकडे शासनाने डोळेझाक करून कंपनीला पाठीशी घातल्याचा आरोपही सिद्धेश्वर मुंडे यांनी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...