agriculture news in marathi, Concept of workcalender will implimetion in Zilla Parishad | Agrowon

जळगाव जिल्हा परिषद राबवणार वर्ककॅलेंडर संकल्पना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018
जळगाव : जिल्हा परिषदेत वर्ककॅलेंडर संकल्पना राबविली जाणार असून, त्या संदर्भातील सविस्तर माहती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सर्व विभागप्रमुखांना सादर केली आहे. कामात गतिमानता, सुसूत्रता आणण्यासाठी ही संकल्पना आणण्यात आली आहे.
 
जळगाव : जिल्हा परिषदेत वर्ककॅलेंडर संकल्पना राबविली जाणार असून, त्या संदर्भातील सविस्तर माहती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सर्व विभागप्रमुखांना सादर केली आहे. कामात गतिमानता, सुसूत्रता आणण्यासाठी ही संकल्पना आणण्यात आली आहे.
 
दिवेकर यांनी सुरवातीला सर्व विभागांचे कामकाज, त्यांच्याकडे उपलब्ध निधी, खर्चाची अंतिम तारीख आदी मुद्दे सर्व विभागांकडून मागविले आहेत. त्यानुसार हे वर्ककॅलेंडर तयार केले. जिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून मिळणारा निधी वेळेत खर्च होत नाही. त्यामुळे निधी परत जाणे, तो खर्च करण्यासाठी पुन्हा परवानग्या घेणे, अशी कार्यवाही करावी लागते. हा निधी परत न जाता  वेळेत खर्च होईल, यासाठी हे कॅलेंडर तयार केले आहे.
सर्व १४ विभागांकडून उपलब्ध निधीची माहिती घेतली. त्यात स्वनिधी व नियोजन समितीकडून प्राप्त निधी असे वर्गीकरण केले. हा निधी खर्च करण्यासंबंधी तांत्रिक माहिती भरणे, खर्चासाठी प्रशासकीय मान्यता घेणे, याचा कालावधी निश्‍चित केला आहे. कुठल्या कामाची केव्हा निवड करायची याचेदेखील निर्देश आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांबाबत लाभार्थींची संख्या निश्‍चित करून अंतिम मंजुरीचा कालावधीही निश्‍चित केला आहे. या वर्ककॅलेंडरनुसार योजनांबाबत कार्यवाही करणे बंधनकारक केले आहे.
या कॅलेंडरमध्ये जुलै महिन्यात काही विभागांना कामकाज गतीने करण्यासाठी निर्देश दिले आहेत. विषेश म्हणजे कृषी विभागाला व्यक्तिगत लाभाच्या योजनांबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यात फवारणी पंप, अवजारे पुरविणे, एचडीपीई पाईपचे वितरण, कृषिपंप पुरवठा, पलटीनांगर पुरवठा आदी योजनांबाबत प्रशासकीय मान्यता मिळवून अंतिम मंजुरी घेण्याचे निर्देश आहेत, अशी माहिती मिळाली.

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...