agriculture news in marathi, The condition of crops in Vidarbha is poor | Agrowon

विदर्भात पिकांची स्थिती बिकट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

अकोला : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार, संततधार पावसाचा इशारा देण्यात आला. मात्र, केवळ ढगाळ वातावरण बनलेले असून पावसाचा पत्ता नाही. यामुळे पावसाबाबतचा अंदाज आता टिंगलटवाळीचा विषय होत आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने पिकांची दरदिवसाला स्थिती बिकट होत असून, सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे.

अकोला : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार, संततधार पावसाचा इशारा देण्यात आला. मात्र, केवळ ढगाळ वातावरण बनलेले असून पावसाचा पत्ता नाही. यामुळे पावसाबाबतचा अंदाज आता टिंगलटवाळीचा विषय होत आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने पिकांची दरदिवसाला स्थिती बिकट होत असून, सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे.

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर खंड पडलेला आहे. सध्या सोयाबीन, उडीद फुलोरावस्थेत तर मुगाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. कोरडवाहू लागवड असलेले कपाशी, तुरीचे पीकवाढीच्या अवस्थेत आहे. या काळात पिकांना पावसाची नितांत गरज भासते. नेमका पाऊस सध्या येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  

पावसाबाबत हवामान खात्याने अंदाज दिलेला असल्याने दिलासा वाटत होता. परंतु, या अंदाजानुसार पाऊस झालेला नाही. गेले दोन दिवस वऱ्हाडातील आकाशात केवळ ढगांची दाटी झालेली दिसून येत आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.   

वऱ्हाडात अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्टा, संपूर्ण बुलडाणा जिल्हा या वर्षीच्या कमी पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. खारपाण पट्‌ट्यात सिंचनाचा कुठलाही स्राेत नसून शेततळीदेखील कोरडी पडली आहेत. इतर भागात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन या पिकांचे सिंचन सुरू केले आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी वीजपुरवठा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. मजुरांकडून सिंचनासाठी एकरी ३०० रुपये मंजुरी घेतली जात आहे.     

इतर अॅग्रो विशेष
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...