agriculture news in marathi, The conditions for buying soybean are Lax | Agrowon

सोयाबीन खरेदीतील प्रमुख अटी शिथिल
विकास जाधव
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

सातारा : सोयाबीन खरेदीसाठी शासनाने लादलेल्या जाचक अटी शिथिल केल्या आहेत. सोयाबीन एकरी उत्पादनाची अट वाढण्यात आली असून, तुरीप्रमाणेच खरेदी केंद्रावर चाळण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला लागलेला ब्रेक निघाला आहेत. आता सातारा, कऱ्हाडसह वाई व कोरेगाव येथे सोयाबीन खरेदी होणार आहे.

सातारा : सोयाबीन खरेदीसाठी शासनाने लादलेल्या जाचक अटी शिथिल केल्या आहेत. सोयाबीन एकरी उत्पादनाची अट वाढण्यात आली असून, तुरीप्रमाणेच खरेदी केंद्रावर चाळण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला लागलेला ब्रेक निघाला आहेत. आता सातारा, कऱ्हाडसह वाई व कोरेगाव येथे सोयाबीन खरेदी होणार आहे.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. सोयाबीनची आतापर्यंत ६० टक्के काढणी उरकली आहे. सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्याकडून खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सोयाबीन प्रतिक्विंटल ३०५० रुपयाने खरेदी व्हावी यासाठी सातारा व कऱ्हाड या दोन केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र केंद्रावर सोयाबीन आणताना त्यात काडी कचरा, मातीमिश्रित नसावा, स्वच्छ चाळणी केलेला असावा.

सोयाबीनची आर्द्रता १२ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असावी, एकरी ८ क्विटंल सोयाबीन खरेदी करता येईल. या घालण्यात आलेल्या अटी शेतकऱ्यांना जाचक ठरत होत्या. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन इच्छा असतानाही खरेदी केंद्रावर सोयाबीन घालता येत नव्हते.

या संदर्भात ‘ॲग्रोवन’मध्ये २४ ऑक्‍टोबर ‘जाचक अटींमुळे सोयाबीन घरात ठेवण्याची वेळ’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना खरेदीतील येणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या होत्या. या बातमीची संबंधित जिल्हा मार्केटिंग विभागाने दखल घेत सोयाबीनची एकरी उत्पादनात वाढ करण्यात आली असून आता एकरी दहा क्विंटलपर्यंत वाढ करण्यात आली. तुरीप्रमाणे खरेदी केंद्रावर चाळण उपलब्ध करून देण्यास सुरवात करण्यात आली आहे.

कऱ्हाड केंद्रावर चाळण उपलब्ध झाली असून उर्वरित तीन केंद्रावर शनिवारपासून चाळणीची सुविधा करण्यात आली आहे. सातबारा व आठ अ उतारावरील सोयाबीनची नोंद असणे अट कायम करण्यात आली असली तरी जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांना सोयाबीन पिकपेरा लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्‍वेंता सिंघल यांनी दिले आहेत. आंतरपिक म्हणून सोयाबीन असले तरी त्यांचीही नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोयाबीन खरेदीतील प्रमुख अटी शिथिल करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर विक्री करणे सोपे जाणार असून हमीभावही मिळणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...