agriculture news in marathi, conference on sugarcane at kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद : रघुनाथदादा पाटील
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सर्व एफआरपी एकरकमी मिळाली पाहिजे. तसेच, ९ टक्के उताऱ्यानुसारच यावर्षीची एफआरपी मिळाली पाहिजे. यासाठी, १० ऑक्‍टोबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत ऊस परिषद घेणार असून, यामध्ये भूजल कायदा, वीज दर आकारणीबाबतही आवाज उठवला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सर्व एफआरपी एकरकमी मिळाली पाहिजे. तसेच, ९ टक्के उताऱ्यानुसारच यावर्षीची एफआरपी मिळाली पाहिजे. यासाठी, १० ऑक्‍टोबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत ऊस परिषद घेणार असून, यामध्ये भूजल कायदा, वीज दर आकारणीबाबतही आवाज उठवला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

श्री. पाटील म्हणाले, की केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे करत आहे. सध्याची एफआरपी १४ दिवसांत देण्याचा कायदा असतानाही त्याचे दोन ते तीन तुकडे केले जातात, कायदा मोडला जातो. असे असताना आता एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्याची मागणी केली जात आहे. हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. गेल्या वर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने एफआरपी अधिक २०० रुपये, असा दर देण्याचे कारखान्यांनी मान्य केले होते. मात्र, वरील २०० रुपयांबाबत आता कोणीही बोलत नाही. काहींची एफआरपीची रक्कमही थकली आहे. शासनाने यावर तत्काळ निर्णय घेतला पाहिजे.

याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, पाणी उपशावर भूजल कायदा करून शेतकऱ्यांची लूट केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर आवाज उठविला जाणार आहे.
 
९ टक्के उतारा गृहीत धरावा
एफआरपी ठरवताना ९ टक्के उताराच गृहीत धरला पाहिजे. यामध्येही शासनाने १० टक्के उतारा धरून एफआरपी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार दर मिळण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे ९ टक्के उताऱ्याप्रमाणेच दर मिळावा, यासाठी आवाज उठविला जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...