agriculture news in marathi, conflict between Swabhimani and Rayat Kranti | Agrowon

‘स्वाभिमानी’ आणि ‘रयत क्रांतीत’ संघर्ष
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

सोलापूर : माढा दौऱ्यावर असलेले  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.२४) दगडफेक केल्यानंतर राज्यात या घटनेचे पडसाद उमटले. खोत यांच्या रयत क्रांती या संघटनेकडून हल्ल्याच्या निषेर्धात आंदोलन झाल्याने काही भागात तणाव निर्माण झाला.  संपूर्ण कर्जमाफीसाठी पुकारलेल्या शेतकरी संपात फूट पाडल्याचा निषेध करत कारखानदारांनी घटवलेला ऊसदर आणि तूर खरेदीच्या विषयावरून माढ्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २४) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गाडी फोडली.

सोलापूर : माढा दौऱ्यावर असलेले  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.२४) दगडफेक केल्यानंतर राज्यात या घटनेचे पडसाद उमटले. खोत यांच्या रयत क्रांती या संघटनेकडून हल्ल्याच्या निषेर्धात आंदोलन झाल्याने काही भागात तणाव निर्माण झाला.  संपूर्ण कर्जमाफीसाठी पुकारलेल्या शेतकरी संपात फूट पाडल्याचा निषेध करत कारखानदारांनी घटवलेला ऊसदर आणि तूर खरेदीच्या विषयावरून माढ्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २४) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गाडी फोडली. मंत्री खोत यांची धावती गाडी अडवून दगडफेक करत शेतकऱ्यांनी तूर आणि गाजर फेकत आपला संताप व्यक्त केला. 

सदाभाऊ खोत हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी शनिवारी पंढरपूरहून बार्शीकडे निघाले होते. त्या वेळी कुर्डूवाडी (ता. माढा) येथे बायपासवर स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, महावीर सावळे, सिध्देश्वर घुगे, सत्यवान गायकवाड यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत, काळे झेंडे दाखवले. या वेळी तूर, गाजर, मकाही मंत्र्यांच्या कारवर फेकण्यात आली. पुढे पंढरपूर ते बार्शी या रस्त्यावर रिधोरे या गावी रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खोत सत्कारासाठी थांबले होते. त्या वेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना उसाचा पहिला हप्ता कारखानदार ठरल्यापेक्षा कमी देतात, तूरीचा घोटाळ्याचा टेम्पो पकडून दिल्यानंतरही सरकार व तुम्ही काहीच भूमिका का घेत नाही, असा प्रश्‍न उपस्‍थित केला. त्या वेळी मंत्री खोत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने शेतकरी संतप्त झाले.

याचवेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष बापू गायकवाड यांनी थेट धावत जात कारवर दगड फेकत संताप व्यक्त केला. त्याचवेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यामुळे तणाव वाढला. सुदैवाने मंत्री खोत यातून बचावले. या घटनेनंतर वातावरण चिघळले. याप्रसंगी खोत यांच्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

औरंगाबादेत राजू शेट्टींचा पुतळा जाळला

औरंगाबाद : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली. ही दगडफेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्याचा आरोप करत खोत यांच्या समर्थक रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेधार्थ औरंगाबादेतील टीव्ही सेंटर भागात खासदार राजू शेट्टी यांचा पुतळा जाळला. खोत यांच्यावर असेच हल्ले होत राहिले, तर राजू शेट्टी यांना मराठवाड्यात येऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, श्रीकृष्ण लोखंडे, श्री. सरोदे, सतीश शिंदे, राम भानुसे, विनायक सांगडे आदी उपस्थित होते.

स्वाभिमानीचे इस्लामपुरातील कार्यालय फोडले

इस्लामपूर, जि. सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यामधील गाडीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघात दगडफेक केली. याचे तीव्र पडसाद इस्लामपुरात उमटले. खासदार राजू शेट्टी यांचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय सदाभाऊ खोतांच्या समर्थकांनी व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.  रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास येथील चौकात ‘स्वाभिमानी’च्या निषेधार्थ घोषणा देत दिल्या. नंतर स्वाभिमानीच्या कार्यालयाकडे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा वळविला. या कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून दारावर लाथा घालून कार्यालयाचा दरवाजा उघडला. जोरदार घोषणाबाजी केली. कार्यालयात असणारे खासदार राजू शेट्टी यांचे पोस्टर कार्यकर्त्यांनी फाडून बाहेर फेकले. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. या घटनेने रयत क्रांती संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संघर्ष वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी रयत क्रांती संघटनेचे गणेश शेवाळे म्हणाले, की मंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून भ्याडपणाचे दर्शन घडविले आहे. याचा निषेध म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीचे कार्यालय फोडले. यापुढे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हिशेबात राहावे, अन्यथा स्वाभिमानीचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही.

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...