agriculture news in Marathi, confusion about loan waiver benefit in solapur district, Maharashtra | Agrowon

सोलापुरात कर्जमाफीच्या लाभाबाबत गोंधळाची स्थिती
सुदर्शन सुतार
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सोलापूर: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजना आणली, शिवाय या योजनेतील काही लाभार्थ्यांना मुहूर्तावर प्रमाणपत्रवाटप करूनही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीच रक्कम जमा झाली नाही. उलट शेतकऱ्यांच्या यादीवरून अद्यापही गोंधळाची स्थिती आहे. किमान प्रमाणपत्रवाटप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने कर्ज रक्कम जमा दाखवण्यासंबंधी जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेला सूचना केली आहे. 

सोलापूर: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजना आणली, शिवाय या योजनेतील काही लाभार्थ्यांना मुहूर्तावर प्रमाणपत्रवाटप करूनही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीच रक्कम जमा झाली नाही. उलट शेतकऱ्यांच्या यादीवरून अद्यापही गोंधळाची स्थिती आहे. किमान प्रमाणपत्रवाटप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने कर्ज रक्कम जमा दाखवण्यासंबंधी जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बॅंकेला सूचना केली आहे. 

गेल्या आठवड्यात लाभधारक शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या तयार झाल्या; पण या यादीतील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. जिल्ह्यातील ज्या २८ शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे, ते सर्व कर्जदार शेतकरी सोलापूर जिल्हा बॅंकेचे खातेदार आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर असलेले कर्ज जमा करून घ्यावे व ही रक्कम राज्य सरकारकडे येणेबाकी दाखवावी, असे सूचनावजा पत्र जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बॅंकेला दिले आहे. यावरून प्रमाणपत्रवाटप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही काही नाही, मग उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी, हा प्रश्‍न विचारला जातो आहे. 

सहकार विभागाने त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे; पण बॅंका अजूनही पुढे येताना दिसत नाहीत. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे आश्‍वासन देऊनही प्रशासनाला हा शब्द पाळता आलेला नाही. जिल्हा बॅंकेलाही पैसे जमा दाखवा, अशी सांगण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका तर शेतकऱ्यांचे ऐकायलाही तयार नाहीत. सरकारकडून आल्यावर पाहू, अशीही उत्तरे काही ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळे शासनाने यासंबंधी तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजनादुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम...
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...