बोदवडमध्ये बोंड अळीच्या अनुदानात गोंधळ

बोदवडमध्ये बोंड अळीच्या अनुदानात गोंधळ
बोदवडमध्ये बोंड अळीच्या अनुदानात गोंधळ

जळगाव  : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई अनुदान मंजूर केले असून, बोदवड तालुक्‍यात या अनुदानाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठ्यांकडील यादीत मंजूर रक्‍कम व जमा झालेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. आठ हजार मंजूर झाले असताना शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपयेच जमा झाल्याचे आढळून आले असून, शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बोंड अळीचे अनुदान २०१७-१८ च्या नुकसानभरपाईबाबत मंजूर रकमेसंबंधीचा हा प्रकार अाहे. त्यामुळे शेतकरी बाजीराव पाचपोळ यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बोदवड शाखेकडे तक्रार केली आहे. अनुदानाबाबत तलाठ्यांकडील यादी मागविल्यानंतर त्यातही तफावत आढळली आहे. स्टेट बॅंकेकडील मागविलेल्या यादीतही अनुदान आठ हजार रुपये जिल्हा बॅंकेकडे वर्ग केले असल्याचे आढळून आले आहे. बॅंकेकडून उडवाउडवीची उत्तरे सुरवातीला पहिला हप्ता मिळाला असेल, बाकी रक्‍कम बाकी आहे. बॅंक खातेक्रमांक चुकीचा आहे. त्यामुळे रक्‍कम परत गेली, अशी उडवाउडवीची उत्तरे बॅंकेकडून दिली जात असून, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जुमानत नाहीत. या संदर्भात सुधारणा करायला ही मंडळी तयार दिसत नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com