agriculture news in marathi, confusion persisted about milk rate, nagar, maharashtra | Agrowon

दूधदराबाबत अजूनही संभ्रम कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

२५ रुपये लिटर दराने दुधाची खरेदी सुरू केली आहे. मात्र, ८.३ पेक्षा कमी एसएनएफ, ३.२ पेक्षा कमी फॅट असलेल्या दुधाला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे ते दूध घेण्याला अडचणी येत आहेत. असे दूध स्वीकारले तरी त्या शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाहीत. शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणेच दूध स्वीकृती करावी लागणार आहे. मात्र, सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना सकस चारा मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडील दूध ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफपर्यंतही बसत नाही.
- संदीप भापकर, दूध संकलक, गुंडेगाव, जि. नगर

नगर ः दूधदरवाढीच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने २५ रुपये लिटर दराने दूध खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार १ ऑगस्टपासून दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी २५ रुपये दर देणार असल्याचे सांगून खरेदीही सुरू केली. मात्र, अनुदान कसे मिळणार, ३.५ फॅट व ८.५ एसएनएफपेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी केल्यानंतर त्याला दर कसा द्यायचा याबाबत अजून काहीसा संभ्रम असल्याने बहुतांश ठिकाणी खरेदीच्या पावत्या देण्याऐवजी त्याची रजिस्टरवर नोंद केली जात आहे. ३.२ फॅट, ८.३ पेक्षा कमी एसएनएफ असलेल्या दुधाला अनुदान मिळणार नसल्याने असे दूध स्वीकारूच नका, असे सांगितले असल्याचे दूध संकलन केंद्र चालक सांगत आहेत.

दुधाला २७ रुपये प्रतिलिटर दर द्यावा किंवा प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने २५ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदीचा निर्णय घेतला. त्याबाबत अध्यादेशही काढला. सुरवातीला २१ जुलैपासून व नंतर झालेल्या बैठकीत १ ऑगस्टपासून २५ रुपये दराने दूध खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार १ ऑगस्टपासून २५ रुपये दर देणार असल्याचे संकलन करणारे सांगत आहेत. आता ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असेल त्याच दुधाला २५ रुपये दर मिळणार आहे.

त्यानंतर प्रत्येक पॉइंटला एक रुपया कमी होईल, मात्र ३.२ फॅट व ८.३ एसएनएफपेक्षा कमी दर्जाच्या दुधाला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफपेक्षा कमी दर्जाचे दूध स्वीकारूच नये, असे सांगण्यात आले असल्याचे दूध संकलक सांगत आहेत. असे असले तरी अजून काही बाबतीत संभ्रम कायम आहे. त्यामुळे सध्या दूध खरेदीच्या संगणकीय पावत्या देण्याएवजी फक्त दुधातील फॅट व एसएनएफसह अन्य रजिस्टरवर नोंदी केल्या जात आहेत. सध्या बहुतांश ठिकाणी पावत्या देणे तात्पुरते बंद आहे. नगर जिल्ह्यात १६५ दूध संघ असून, त्यात १४५ खासगी, १२ सहकारी आणि १० मल्टिस्टेट दूध संघांचा समावेश आहे. ८७९ सहकारी संघांची संकलन केंद्रे असून, दर दिवसाला साधारण २४ लाख लिटर दूध संकलन केले जाते.
 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...