agriculture news in marathi, Confusion at Sangliit Warranty Center | Agrowon

सांगलीत हमीभाव केंद्रावर गोंधळाचीच हमी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, ऑनलाइन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत. त्यातच जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यास प्रस्तावच दाखल झाले नसल्याने केवळ तीन ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरातून केवळ ८७ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. मात्र, शेतीमालाची खरेदी केव्हा सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, ऑनलाइन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत. त्यातच जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यास प्रस्तावच दाखल झाले नसल्याने केवळ तीन ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरातून केवळ ८७ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. मात्र, शेतीमालाची खरेदी केव्हा सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी प्रसिद्धी देऊनही जिल्हाभरातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी खरेदी केंद्र अपेक्षित असताना, केवळ सांगली, तासगाव व विटा येथेच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी एकाही संस्थेकडून प्रस्ताव आलेला नसल्याने त्या भागातील शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

जिल्ह्यात सांगली येथे विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघ, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघ, विटा व आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघ तासगाव या तीनच ठिकाणी नोंदणी सुरू आहे. याउलट जतसारख्या ठिकाणी उडदाची अधिक नोंदणी अपेक्षित असताना त्या ठिकाणी एकाही संस्थेने केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिलेला नाही, तसेच वाळवा तालुक्‍यातही सोयाबीनचे क्षेत्र चांगले असताना तेथेही खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आलेला नसल्याने शेतकऱ्यांना इतरत्र शेतीमाल न्यावा लागतोय.

खरीप हंगामातील पिकांची काढणी होऊन दोन महिने झाले आहेत. शेतीमालाची किमान आधारभूत किंमत ही बाजारातील दरापेक्षा अधिक आहे. मात्र, खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतीमालाची विक्री करावी लागत आहे. खरेदी केंद्राची अडचण असतानाच शेतीमालाच्या नोंदणीसाठी ऑनलाइन सात-बारा उतारा सक्तीचा करण्यात आला आहे.

तासगावला मूगासाठी एकाचीही नोंद नाही
सांगलीत सोयाबीनसाठी एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही, तर उडिदाची ६०, तर मुगाची केवळ ३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तासगावला सोयाबीनला ३, उडदासाठी २, तर मूगासाठी एकाही शेतकऱ्याची नोंद नाही. विटा येथे सोयाबीनची २, उडीद १४, तर मुगाची ३ शेतकऱ्यांनी आजवर नोंदणी केली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...